कोल्हापूर उत्तर निकाल : सत्यजित कदम पिछाडीवर; महाडिक पंपावर शुकशुकाट

कोल्हापूर उत्तर निकाल : सत्यजित कदम पिछाडीवर; महाडिक पंपावर शुकशुकाट
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा 'उत्तरा'धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.

आतापर्यंत २६ पैकी ५ व्या फेरी अखेर ३६७३ मते जयश्री जाधव यांना तर सत्यजित कदम यांना ४१९८ मते मिळाली आहेत. ६७५८ मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत, तर ५ व्या फेरीत सत्यजित कदम यांना ५२५ मतांनी आघाडी आहेत.५ वी फेरी कदम वाडी व जाधववाडी या प्रभागातून झाली.

सत्यजित कदम आघाडी तोडत असले, तरी मतांचा फरक अधिक असल्याने जिल्ह्यातील महाडिक गटाच्या राजकीय हालचालींचे केंद्र असलेल्या महाडिक पेट्रोल पंपावर शुकशुकाट आहे. भाजप उमेदवार सत्यजित कदम हे महाडिकांचे नातेवाईक आहेत.

दरम्यान जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टरही झळकू लागले आहेत. कसबा बवड्यातील पिंजर गल्ली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, बाल शिवाजी तरुण मंडळ, शाहू तरुण मंडळ, छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटी, जय शिवराय तरुण मंडळ, जयहिंद स्पोर्ट्स, कैलासवासी सुरेश मित्र मंडळ, अचानक ग्रुप, गजू ग्रुप यांनी पोस्टर लावले आहे.

? कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

वेळ: 9. 27 AM

फेरी 5

फेरीतील झालेले मतदान: 8061
समाविष्ट भाग: कदमवाडी, जाधववाडी-४

१) जयश्री जाधव – 3673
२) सत्यजित कदम – 4198

या फेरीतील लीड: – 525
फेरी अखेर एकूण लीड:- 6758
मोजलेली मते: 39,403
मोजायची मते: 1,39,139

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news