

कोल्हापूर : Kolhapur Ambabai Temple : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात लवकरच अंबाबाईची आरती, मंत्रोच्चार आणि भक्तिसंगीत कानी पडणार आहे. मंदिर परिसरात 80 म्युझिक पोल्स (संगीत खांब) उभारले जाणार आहेत. त्यामुळे मंदिर आणि परिसरात भाविकांना सुगम भक्तिसंगीत ऐकायला मिळणार असून, भक्तिरसात ते चिंब भिजणार आहेत. शिवाय, लुकलुकत्या रोषणाईमुळे परिसर आकर्षक होणार आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांना विविध सुविधा देण्याबरोबरच या परिसराचा कायापालट करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने या परिसरात म्युझिक पोल्स उभारले जाणार आहेत. Kolhapur Ambabai Temple
शिवाजी चौक ते भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ते भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर ते भवानी मंडप आणि जोतिबा रोड या ठिकाणी हे खांब उभारले जाणार आहेत. या खांबांची रचना ऐतिहासिक पद्धतीची आणि आकर्षक असेल, यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या म्युझिक पोल्समधून या परिसरातील भाविक, पर्यटक, नागरिक यांच्या कानी भक्तिसंगीत पडणार आहे. याबरोबरच त्यातून अंबाबाईची आरती, मंत्रोच्चाराचा जपही केला जाणार आहे.
Kolhapur Ambabai Temple : लवकरच कामाला सुरुवात
आपत्कालीन स्थिती तसेच अत्यावश्यक बाबींसाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम म्हणूनही त्याचा उपयोग केला जाणार आहे. याकरिता सुमारे दोन कोटी 83 लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला जाणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच याचे काम सुरू केले जाणार आहे.
हे ही वाचा :