

हमीदवाडा; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्याच्या पूर्वेला सोनगे येथील एक तरूण बुडाला. संजय आनंदा तोरसे (वय ४३, मूळ गाव खडकेवाडा ता. कागल) असे त्या तरूणाचे नाव आहे. ही घटना आज (दि. ७) सकाळी घडली. त्याच्या मृतदेहाचा शोध रेस्क्यू टीम मार्फत सुरू आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोनगे गावची यात्रा बुधवारी असल्याने कपडे धुण्यासाठी पत्नी, मुले व वडील यांच्यासह संजय हे बस्तवडे बंधाऱ्या जवळ गेले होते. कपडे धुतल्यानंतर संजय मुलांसह आंघोळीसाठी नदीत गेले. आनुरकडील बाजूस जाऊन परत येताना मुले पुढे आली पण संजय हे पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यांना त्यातून बाहेर पडता आले नसल्याने ते बुडाले. त्यांच्या मृतदेहाचा शोध गडहिंग्लज येथील रेस्क्यू टीममार्फत सुरू आहे. याबाबत माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :