

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मात्र, आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या मैदानात उतरलेला नाही. हार्दिकच्या अनुपस्थित गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा फिरकीपटू राशिद खान याच्यावर सोपवण्यात आली आहे.
राशिद खानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकबाबत बोलताना राशिद खान म्हणाला, "हार्दिक पंड्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो आजच्या सामन्यात मैदानात उतरला नाही. हार्दिकने आज विश्रांती घेतली आहे." गुजरातचा संघ यावर्षी आयपीएलचा हंगाम खेळत आहे. २०२२ मध्ये पहिल्याच हंगामात या संघाने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला होता.
गुजरात टायटन्सचा संघ : वृद्धीमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स : रेहमदुल्लाह गरबाज, एन जगदिसन, नितिश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती