

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने आहेत. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. गुजरातचा कर्णधार राशिद खाने याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातने २०४ धावा केल्या आणि कोलकातासमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
साई सुदर्शनची ३८ चेंडूमध्ये ५३ धावांची अर्धशतकी खेळी, शुभमन गिलच्या ३१ चेंडूमध्ये ३८ धावा आणि विजय शंकरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने २०४ धावा केल्या. गुजरातच्या ९ षटकानंतर ८३ धावा होत्या. मात्र, विजय शंकरने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने गुजरातने कोलकातासमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले. कोलकाताकडून सुनील नारायणने ३ विकेट्स तर सुयश शर्माने १ विकेट पटकावली.