

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशातील शेतकऱ्यांना एक विशेष ओळखपत्र देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज (दि.१४) मंगळवारी लोकसभेत दिली. (Kisan ID)
शेतकऱ्यांनी ज्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या सर्व कृषी योजनांसोबत त्यांना जोडण्याचे काम हे या विशेष ओळखपत्राच्या माध्यमातून केले जाईल, अशी माहिती तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नासंबंधी लिखित उत्तर देतांना दिली.
केंद्र सरकारच्या या पुढाकारामुळे ई-केव्हायएफ (नो युअर फॉर्मस) च्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख करण्यात मदत मिळेल.
विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांसाठी विविध विभागांमध्ये वारंवार कागदपत्रे जमा करण्याच्या समस्येतून दिलासा मिळेल, असा विश्वास देखील तोमर यांनी व्यक्त केला.
हवामानाच्या स्थितीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाचे आकलन देखील या विशेष ओळखपत्राच्या मदतीने सोयीस्कररित्या केले जाईल, असे तोमर म्हणाले.
९ डिसेंबर पर्यंत पीएम-किसान योजनेअंतर्गत नोंदणी डेटाबेस मध्ये ११.६४ कोटी शेतकरी सहभागी आहेत. यात तामिळनाडूचे ४७.८२ लाख शेतकर्यांनी नोंदणी केल्याचे कृषी मंत्री म्हणाले.