

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओचा (Kirit Somaiya Viral Video) पेन ड्राईव्ह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दाखवला. राज्य सरकारने या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
तर हा प्रकार गंभीर आहे. या व्हिडिओची (Kirit Somaiya Viral Video) सत्यता समोर आली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कुणालाही पाठिशी घालणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा