

पुढारी ऑनलाईन डेस्क
भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप- प्रत्यारोप आणि कारवाईचे सत्र अद्याप सुरूच आहे. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, येत्या काही दिवसांत ठाकरे सरकारमधील एक तरी घोटाळा मी उघडकीस आणून दाखवीन. तसेच महाविकास आघाडीतील आणखी एक घोटाळा उद्या (दि.१५) उघडकीस आणणार असल्याचे सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर INS Vikrant च्या नावाखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हाही दाखल झाला आहे. याप्रकरणी बोलताना, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. आरोपी हा निर्दोष नाही, त्यामुळे सोमय्यांनी उगाच वचवच करू नये.