

मुंबई, पुढारी ऑनलाईन : भाजप नेते किरीट साेमय्या आणि त्यांचे पुत्र नील साेमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीत झालेल्या अपहार प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीत सोमय्या पिता-पुत्रांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्या आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत ५८ काेटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की, INS विक्रांत मध्ये ५८ कोटींचा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांनी , INS विक्रांतचा ठेवलेल्या पैशांचा वापर किरीट सोमय्या यांनी व्यवसायासाठी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट साेमय्या आणि त्यांचे पुत्र नील साेमय्या यांच्वियारुद्ध ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: