Maharashtra Board SSC Result | दहावीचा निकाल लागताच सिग्‍नल शाळा आनंदाने डोलू लागली, किरण काळे ६० टक्क्यांनी उत्‍तीर्ण

Maharashtra Board SSC Result | दहावीचा निकाल लागताच सिग्‍नल शाळा आनंदाने डोलू लागली, किरण काळे ६० टक्क्यांनी उत्‍तीर्ण
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहरातील विविध सिग्‍नलवर असलेल्‍या पुर्वाश्रमीच्‍या भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्‍या मुळ प्रवाहात आणण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या सिग्‍नल शाळेचा विद्यार्थी किरण काळे दहावीच्या परिक्षेत ६० टक्क्यांनी उत्‍तीर्ण झाला. वडील नसलेला किरण काळे आठ वर्षांचा असताना सिग्‍नल शाळेत दाखल होता. ( Maharashtra Board SSC Result )

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ संस्‍थेच्‍या माध्‍यमातून चालवल्‍या जात असलेल्‍या सिग्‍नल शाळेतील किरण काळे हा विद्यार्थी ६० टक्‍के गुण मिळवत दहावी उत्‍तीर्ण झाला. तीन हात नाक्‍याखाली वडील नसलेला किरण आपल्‍या आईसोबत निर्वासित आयुष्‍य जगत होता. सिग्‍नल शाळेमुळे वयाच्‍या आठव्‍या वर्षी त्‍याला शाळेचे विश्‍व गवसले. सिग्‍नल शाळेत थेट तिसरीत दाखल झालेल्‍या किरणने आपल्‍यातील शैक्षणिक अनुशेष भरून काढत अभ्‍यासात चांगली प्रगती केली. त्‍याची ही प्रगती पाहुन संस्‍थेने त्‍याला सरस्‍वती सेकंडरी शाळेत प्रवेश दिला. तेथे देखील त्‍याने चांगले यश संपादन केले व आज दहावीच्‍या निकालात ६० टक्‍यांनी उत्‍तीर्ण होत तो रस्‍त्‍यावरील मुलांसाठी आशेचा किरण ठरला.

किरणची आई मीना काळे ही निरक्षर असून गोखले रोडवर गजरे विकण्‍याचा व्‍यवसाय करते. किरण पुढील शिक्षण घेऊन आईसाठी एक घर घ्‍यायचे आहे. सिग्‍नल शाळेच्‍या प्रकल्‍प प्रमुख आरती परब व शिक्षिका शैला देसले, सरला पाटोळे, पोर्णिमा करंदीकर, समिधा इनामदार, प्रीया जाधव आदी शिक्षकांचा किरणच्‍या यशात विशेष योगदान आहे. ( Maharashtra Board SSC Result )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news