

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावजवळ असणाऱ्या कोठे बु' गावातील खांडगेदरा येथे आई आणि तीन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. मृत व्यक्तींमध्ये आईसह दोन मुली आणि एक चार वर्षांच्या चुमुकल्या मुलाचा समावेश आहे.
आई स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (वय-३), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय-४) आणि चार महिन्यांचा मुलगा (सर्व रा.खांडगे दरा ता. संगमनेर जि. अनगर) असे मयत आई आणि मुलांची नावे आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावजवळ असणाऱ्या कोठे बु' गावातीलखांड गेदरा येथे स्वाती बाळासाहेब ढोकरे या आपल्या मुलांना घेऊन असे राहत होत्या. परंतु शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास त्या चौघांचा मृत देह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती कळताच अनेकांनी ढोकरे यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि ढोकरे परिवाराचे सांत्वन केले. या महिलेने आपल्या मुलांसह नेमकी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या का केली, या विषयी पठार भागात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घार गावचे पोनि सुनील पाटील हे आपल्या सहकारी खांडगेदरा भागातील घटना स्थळी पोहचले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि विहिरीतून त्या आईचे व तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.