

अमृतसर; वृत्तसंस्था : आमची जिद्द इंदिराजीही मोडून काढू शकल्या नाहीत. पंतप्रधान मोदी किंवा अमित शहाही ती मोडून काढू शकणार नाहीत, असे वक्तव्य वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याने केलेले आहे. अमृतपाल याच्या हजारो समर्थकांनी गुरुवारी अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि बंदोबस्तावरील 800 वर पोलिसांच्या समोर अटकेतील आरोपी (अमृतपाल समर्थक लवप्रीत सिंग) सोडवून घेऊन गेले. हल्लेखोरांकडे बंदुका, तलवारी आणि भाले होते. (Amritpal Singh)
अमृतपाल सिंग याला भिंद्रानवालेचा भाग 2 म्हटले जाते. अमृतपाल याचा जन्म अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा येथे 1993 मध्ये झाला. तो बारावीपर्यंत शिकलेला आहे. 2012 मध्ये दुबईत त्याने ट्रान्स्पोर्ट सुरू केला होता. गतवर्षी दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर वारीस पंजाब दे संघटनेसाठी तो पंजाबला परतला. 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू मुख्य आरोपी होता, हे येथे उल्लेखनीय! 29 सप्टेंबर 2022 रोजी या संघटनेचा प्रमुख बनला. रोडे या गावात हा कार्यक्रम झाला. खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले रोडे गावचाच रहिवासी होता, हे या आयोजन स्थळाच्या निवडीमागचे औचित्य होते. (Amritpal Singh)
एकीकडे दीप सिद्धू याचा भाऊ मनदीपसिंग सिद्धू मात्र माझा भाऊ दीप हा अमृतपालप्रमाणे फुटीरवादी नव्हता, असे उघडपणे सांगतो. अमृतपाल हा दीप सिद्धूचा नव्हे, तर भिंद्रानवालेचा वारसा चालवतो आहे, असेही म्हणतो. अमृतपालने आपल्या उक्ती आणि कृतीतून ते सत्य आहे, हे सिद्ध केले आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर आमची नजर आहे, या अमित शहांच्या वक्तव्यावर आम्ही खलिस्तानवर बोलू, आम्हाला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमृतपालने दिली होती. (Amritpal Singh)
कोण होता भिंद्रानवाले ?
काय आहे अमृतपाल भाग-2?
अधिक वाचा :