Ketaki Mategaonkar : मी तुमच्या भाषेत हाडांचा सापळा…केतकीने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल

Ketaki Mategaonkar
Ketaki Mategaonkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतास, (Ketaki Mategaonkar) आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असस, ऑफिस मधले सहकर्मचारी असो कोणीही असो आपल्याला नेहमी अशा वाक्यांना सामोरं जावं लागतं. असे म्हणत केतकीने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले. (Ketaki Mategaonkar)

संबंधित बातम्या –

तिने पुढे म्हटलंय-शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी (हाडांचा सापळा) बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकत १८-१७ तास शूट करताना हेच माझं शरीर उत्तम साथ देतं.

थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल. पण म्हणून अनहेल्दी आहे का? तर अजिबात नाही. व्यायाम किंवा जिम हा फक्त वजन कमी करायला लागतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठिक आहे. पण, अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कामेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्ट्सवर ओपनली कॉमेंट करणं. याला तुम्ही स्वातंत्र्य आणि फ्री स्पीच असं नाव देता.

आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील, आई असेल. ह्याचा विचार करा. आणि काही लोकं असे असतील ज्यांना खरंच मेडिकल प्रोब्लेम असेल, ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल. मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय. आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन.

केतकीने जिममधील व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर केतकीला अनेक कॉमेंट्स आल्या होत्या. यामद्ये काही ट्रोलर्सनी तिला तिच्या शरीरयष्टीवरून ट्रोल केले होते. कॉमेंट्सपैकी काही जणांचे कॉमेंट्स तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये ट्रोलर्सनी म्हटले होते- अगं yz गेल्यावेळी पण तुला सांगितलं ना की आईच्या हातचे दोन घास खा अंगाला लागेल काहीतरी काय दशा झाली आहे बघ, कसला कर्माचा व्यायाम करते. आणखी एका ट्रोलर्सने तिची कुपोषित म्हणत खिल्ली उडवली होती. तर तिसऱ्या एका ट्रोलरने बडा कमजोर लेग पीस है असे म्हणत तिची थट्टी केली होती.

चाहत्यांनी केले समर्थन

यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचे समर्थन करत कामेंट्स केले आहेत. चाहत्यांनी कॉमेंट सेक्शन बॉक्समध्ये काय काय म्हटलंय पाहुया. –
केतकी ट्रोलिंगकडे लक्ष नको देउस तू. आपले शरीर हे देवाने दिलेली देणगी आहे. आयुष्य सुंदर आहे ते छान जग तू तुझ्या गाण्याच्या कलेतून आम्हाला आनंद देतेस तू. आनंदी रहा., लोकं बोलतील दुर्लक्ष कर…, त्याना सांग एव्हढी काळजी असेल तर तुम्ही किराणा भरा आमच्या घरचा आणि बाकीचा रोज च लागणार, लोकांकडे कडे कशाला लक्ष देतेलोक तर देवाला पण नाव ठेवतात, अग मग तुपण स्वतःमध्ये improve कर ना.. चांगली Figure बनव.. आणि त्यांचे तोंड बंद कर.. विनाकारण इंस्टावर complaint करून काय होणार ? तु पण थोडं लक्ष दे ना तब्येतीकडे.. कस तुला कोणी projects मध्ये घेणार जर तू Physically fit नसेल तर ? atleast 10 kg तरी weight gain कर ? All the best .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news