Sunny Deol : सनी देओल रस्त्यावर चक्क मद्यधुंद अवस्थेत?; रिक्षाचालकाने केली मदत

Sunny Deol
Sunny Deol
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (sunny deol ) 'गदर २' हा चित्रपटाने तुफान कमाई करत धुमाकूळ घातला. या चित्रपटात सनीसोबत बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर यांनी दर्जेदार भूमिका साकारलीय. दरम्यान सनीचा मुंबईच्या रस्त्यावरील मद्यधुंद अवस्थेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. सनीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे. मात्र, हा व्हिडिओ चित्रपटातील आहे की?, नेमकं या मागचं सत्य काय आहे?, याबद्दल नेटकऱ्याच्यात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संबंधित बातम्या 

अभिनेता सनी देओलच्या (sunny deol ) एक्स (x) टविट्वर नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो मुंबईतील जुहू सर्कल येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत फिरताना दिसत आहे. या व्हिडिओत सनी दारू पिवून रपस्त्यावर इकडे- तिकड फिरत असून रस्त्याच्या मध्येच तो एका रिक्षा धडकतो. यानंतर रिक्षाचालक रिक्षा थांबवतो आणि सनी देओलला रिक्षात बसवतो. असे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी खास करून सनीसोबत काही व्हिडिओ शूट करणारे लोकही दिसत आहेत. सनीने यावेळी व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट- पायात बूट परिधान केलं आहेत. दरम्यान शूट घेताना त्याच्या समोरून एक कारही जाताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टस करताना अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. दरम्यान एका युजर्सने सनीचा हा व्हिडिओ फेक असल्याचा म्हटलं आहे. काही युजर्सनी सनीने खरोखर दारू प्यायली नसून त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगचा भाग असल्याचे म्हटलं आहे. तर दुसरीकडे खरोखरचं आगामी चित्रपटाचे शुटिंग आहे की आणखी काय?, या मागचं नेमकं सत्य काय आहे?. याबद्दल अजून अधिकृत्त माहिती मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news