कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून राज्याची अवहेलना सूरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले आहे, अशी टीका शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतबाबत केलेल्या वक्तव्यावर केली. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र यावं. राज्यपालांना हटवलं नाही तर शिवसेनेला जे करायच ते करून दाखवणारच, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मुंबई येथे

आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे, "  ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल पदी नेमलं जात आहे का? असा प्रश्न केंद्राला विचारला पाहिजे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवले पाहिजेत. दोन तीन दिवस वाट पाहूया, राज्यपालांना हटवलं नाही तर सर्वांनी एकत्र येवून महाराष्ट्र द्रोह्यांना जागा दाखवून देवू, असा इशारा त्यांनी दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा सातत्याने अपमान होत आहे. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, शक्ती असे काहीच नसल्यासारखं सर्व चाललं आहे. छत्रपतींचा अपमान झाल्यानंतर ज्यांनी अपमान केला त्यांच्याच पक्षाकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. कुणीही टपलीत मारवं असं सध्या सुरू आहे.महाराष्ट्रातील खोके सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाहीत ते कळत नाही, असेही ठाकरे म्‍हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्‍याकाही अपेक्षाच नाही. पहचान कोन सारखं राज्यात मुख्यमंत्री कोण असं झालंय. उपमुख्यमंत्री तर नेहमीच सारवासारव करतात. राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलू शकतात का? बोम्मई वरिष्ठांच्या परवानगी शिवाय बोलले का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news