

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडमधील धर्मसंसदेत अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाने महात्मा गांधींजी बाबत संतापजनक वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद ठाण्यात देखील उमटले होते. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात २९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी भादवी गुन्हा दाखल केला होता. (Kalicharan BABA)
या गुन्ह्यात अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाला नौपाडा पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कालीचरण बाबाला घेऊन पोलीस पथक ठाण्यात पोहचेल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण बाबाने महात्मा गांधींजी बाबत संतापजनक वक्तव्य केले होते. त्याच बरोबर विरोधात जातील त्यांना कापुन टाकेल अस वक्तव्य केले होते. त्यामुळे नवा वाद उभा राहिला होता.
दरम्यान, या बाबा विरोधात राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी २९ डिसेंबर २०२१ रोजी स्वतः नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबासह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी कालीचरण बाबाला बुधवारी रात्री रायपूर येथील मध्यवर्ती तुरुंगातून अटक केली. वर्धा पोलिसांनी कालीचरण बाबाला काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
या प्रकरणात स्थानिक न्यायालयाने कालीचरण बाबास न्यायालयीन कोठडी सुनावत रायपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पासून कालीचरण बाबा छत्तीसगड मधील रायपूर मध्यवर्ती कारागृहात होता.
रायपूर कोर्टातून ट्रान्सफर वारंट घेऊन ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री कालीचरण बाबाचा ताबा घेतला. नौपाडा पोलिसांचे एक पथक कालीचरण बाबास घेऊन ठाण्याकडे रवाना झाले असून हे पथक गुरुवारी सायंकाळ पर्यंत आरोपीस घेऊन ठाण्यात पोहचेल अशी माहिती पोलिसांनी दिली.