काजोलने खरेदी केले दोन महागडे फ्लॅट ; किंमत पाहून भूवया उंचावल्या !
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेत्री काजोलने जुहू परिसरातील अनन्या अपार्टमेंटमध्ये दोन नवीन फ्लॅट खरेदी केले आहेत. या नवीन खरेदी केलेले दोन्ही फ्लॅट आलिशान आणि खूप महाग आहेत. त्यांची एकूण किंमत सुमारे 11 कोटी 95 लाख रुपये आहे.
बॉलीवुड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांच्याकडे आधीच अनेक अलिशान आणि अधिक किंमतीच्या मालमत्ता आहेत. आता जुहूमधील या दोन फ्लॅटचाही या नवीन घरांच्या यादीत समावेश झाला आहे. एका रिपोर्टनुसार, काजोलने या दोन्ही फ्लॅटसाठी जानेवारी महिन्यातच मोठी रक्कम भरली आहे.
काजोलचे घर किती मोठे आहे?
Squarefeetindia ने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही फ्लॅट10 व्या मजल्यावर आहेत. दोन्ही फ्लॅट सुमारे 2000 चौरस फूटाचे असल्याचेही सांगितले जात आहे. काजोलची ही दोन्ही नवीन घरे तिच्या शिवशक्ती बंगल्याजवळच आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासासाठी फार लांबचा प्रवास करावा लागणार नाही.
घराच्या कागदांवर सही कोणाची?
TOI मधील वृत्तानुसार, मालमत्तेच्या कागदपत्रांवर काजोल अजय देवगण आणि त्रक्षा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्वाक्षरी आहेत. यापूर्वी काजोल 'त्रिभंगा- टेढ़ी मेढ़ी क्रेजी' या चित्रपटात काम करताना दिसली होती. रेणुका शहाणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात काजोलसोबत तन्वी आझमी आणि मिथिला पालकरही दिसल्या होत्या.
हे ही वाचलत का?
- गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे 200 जणांची कोट्यवधींची फसवणूक
- Biometric Attendance : केंद्रीय कर्मचार्यांच्या बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात, वर्क फ्रॉम होमची सुविधाही बंद
- Gold Price : सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
- HIV negative : अमेरिकेतील महिलेची 'एचआयव्ही'वर मात, 'स्टेम सेल ट्रान्स्प्लांट'ने यशस्वी उपचार

