

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जुन्नरचे आजी-माजी आमदार पुन्हा एकमेकांना भिडले आहेत, या कारण ठरले रस्त्याच्या भूमिपूजनाचे…आमदारच एकमेकांना भिडले म्हटल्यावर दोन्ही आमदार समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात शनिवारी दुपारी हा घडला.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकें यांच्यामधील टोकाचा राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला. यावेळी 'चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचे शरद सोनवनेंनी बेनकेंना फटाकारले, तर रस्ता करत असताना अडचणीवर मात करुन पुढे जात असताना कुणाच्या राजकारणाची गरज नसल्याचे बेनकेंनी सुनावले. यावरुन दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. आळेफाटा पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. पोलिसांचा मोठा फौजफाटा बेल्हे गावात तैनात आहे. दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष, आमचा रस्ता करून द्या असे म्हणत ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा: