Journey to Mars from Earth : पृथ्वीवरून मंगळाचा प्रवास केवळ 45 दिवसांत?

Journey to Mars from Earth : पृथ्वीवरून मंगळाचा प्रवास केवळ 45 दिवसांत?
Published on
Updated on

न्यूयॉर्क : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर माणसाला आपल्या शेजारचा ग्रह मंगळावर जाण्याची स्वप्ने पडू लागली. मात्र, या मार्गात ज्या अडचणी आहेत त्यामध्ये पृथ्वी ते मंगळदरम्यानचे दीर्घ अंतर आणि अंतराळयानाला मंगळापर्यंत (Journey to Mars from Earth) जाण्यासाठी लागणारा अनेक महिन्यांचा वेळ यांचा समावेश आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा' ने म्हटले आहे की पृथ्वी ते मंगळाचा प्रवास सात महिन्यांचा आहे. आतापर्यंत मंगळावर गेलेल्या सर्व रॉकेटला जवळपास सारखाच वेळ लागला आहे. मात्र, आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रवास अवघ्या 45 दिवसांवर येणार आहे.

'न्यूक्लियर थर्मल अँड न्यूक्लियर इलेक्ट्रिक प्रोपल्जन' असे या नवीन तंत्रज्ञानाचे नाव आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 'नासा' मानवी मंगळ मोहिमेसाठी असे रॉकेट बनवणार आहे, (Journey to Mars from Earth) ज्यामध्ये अणुइंधन वापरले जाईल. रॉकेट बनवण्यासाठी दोन तंत्रांचा वापर केला जाणार आहे. प्रथम – न्यूक्लियर थर्मल प्रोपल्शन. त्यामध्ये अणुभट्टी असते, जी लिक्विड हायड्रोजन प्रोपेलेंट गरम करते. तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने प्लाझ्मा तयार होईल.

हा प्लाझ्मा रॉकेटच्या नोझलमधून बाहेर काढला जाईल, ज्यामुळे रॉकेटला पुढे जाण्यासाठी गती मिळेल. 1955 मध्ये, यूएस एअर फोर्स आणि अणुऊर्जा आयोगाने अशी प्रोपल्शन सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला होता. दुसर्‍या तंत्रज्ञानाचे नाव आहे न्यूक्लियर इलेक्ट्रिक (Journey to Mars from Earth) प्रोपल्शन. यामध्ये अणुभट्टी आयन इंजिनला वीज देते, ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार होते. हे क्षेत्र झेनॉन सारख्या वायूंना गती देते, ज्यामुळे रॉकेटला पुढे जाण्याचा वेग मिळतो. 2003 आणि 2005 मध्येही ही यंत्रणा बनवण्याचे प्रयत्न झाले.

नवीन तंत्रज्ञानाद्वारे शास्त्रज्ञ रॉकेटची (Journey to Mars from Earth) कार्यक्षमता जवळपास दुप्पट करू शकतील. रॉकेट बनवण्याची ही संकल्पना फ्लोरिडा विद्यापीठातील हायपरसोनिक्स प्रोग्राम एरिया लीड प्रोफेसर रेयान गोसे यांनी दिली आहे. त्याचा पहिला टप्पा विकसित करण्यासाठी, आणखी 13 लोकांना त्याच्यासोबत सहसंशोधनात सहभागी करून घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 12.5 हजार डॉलर्स म्हणजेच 10 लाख 18 हजार रुपये ही प्रारंभिक रक्कमही देण्यात आली आहे.

सध्या आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये यानाला पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी 7 ते 9 महिने लागतात. या वेगाने आपण मानवाला मंगळावर पाठवले तर दर 26 महिन्यांनी एक अंतराळयान मंगळावर जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच, एखादे मिशन फक्त 3 वर्षांसाठी चालवता येईल. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे मंगळावर जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. पृथ्वी ते मंगळाचा प्रवास (Journey to Mars from Earth) केवळ 6.5 आठवड्यांचा असेल, ज्यामुळे मिशनचा खर्च कमी होईल आणि वेळ वाढेल. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात, लोकांना आरोग्य समस्या कमी होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news