

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी रुग्णालयाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. आज (दि.१६) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस, सुरक्षा दल आणि नागरी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
राजौरी येथील लष्करी रुग्णालयाजवळ अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. पोलीस, सुरक्षा दल आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांनी जम्मू-राजोरी महामार्गावर उतरून निदर्शने केली. लष्कराच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी याबाबत घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. या प्रकरणाची चौकशी करून एफआयआर नोंदवावा, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची भरपाई, नातेवाईकांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.
हेही वाचा :