

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेमध्ये दोन्ही लोकसभेच्या जागांवर युती व आघाडी पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार बैठका चर्चा व घटक पक्षांच्या चर्चा करून प्रचाराची आखणी करताना दिसून येत आहे. यात भाजपा मोदींचे व्हिजन घेऊन पुढे जात आहे. तर आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुढे करत आहे. यामुळे मतदानपेटीमध्ये मोदी व्हिजन विरुद्ध शेतकरी असा सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. तर आघाडी व युती यांना वचित बहुजन आघाडी यांनी दोन्ही लोकसभा मतदासंघांमध्ये आपले उमेदवार देऊन आवाहन दीले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर जळगाव लोकसभेत युती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे. हे आधीपासूनच ठरलेले होते भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोण उमेदवार देणार याच्यावर बरीच चर्चा व उमेदवार रांगेत होते. अखेर भाजपमधून बाहेर पडलेले दोन्ही उमेदवारांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली.
आता दोन्ही बाजूचे दोघे उमेदवार जाहीर झाल्यामुळे प्रचार बैठका चर्चासत्र भेटीगाठी यांचे सत्र सुरू झाले आहे. यात नाराज कार्यकर्त्यांचे समजूत काढण्यात येत आहेत. प्रत्येक जण आपली जमेची बाजू अधिक भक्कम करण्यावर प्रयत्न करीत आहेत. भाजपाच्या उमेदवारांनी बैठकांचा धुमाकूळ लावलेला असताना आघाडीचे नेत्यांनी जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांकडे जाऊन भेटीगाठी आरंभल्या आहेत. जळगाव लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध मराठा तर रावेर लोकसभेमध्ये लेवा पाटील विरुद्ध मराठा अशी लढत रंगणार आहे. गेल्या वर्षी रावेर लोकसभेमध्ये लेवा पाटील विरुद्ध मराठा अशी लढत होती. मात्र या लढतीमध्ये रक्षा खडसे यांनी बाजी मारली होती. ४०० पार हे लक्षात ठेवून भाजपा कामाला लागलेली आहे. मोदींचे-२०४५ चे व्हिजन यावर ते भर देत असून त्यांना पंतप्रधान करायचे ही घोषवाक्य घेऊन ते मैदानात उतरले आहेत. महाआघाडीतील दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी शेतकरी प्रश्नाला प्रथम स्थान दिले आहे व त्याच मुद्द्यावर ते रिंगणात उतरत आहेत.
निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचे ट्रम कार्ड कोणाच्या बाजूने कौल देणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर वंचित आघाडीने रावेर नंतर जळगाव लोकसभेचा ही उमेदवार जाहीर केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली स्वतःची एका आघाडी उघडून युती व महाआघाडी यांच्याविरुद्ध लोकसभेत मोर्चा उघडला आहे, ते कितपत या दोन्ही आघाड्यांना आव्हान देऊ शकतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा: