

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड स्टार करीना कपूर-खान हिच्या पहिल्या ओटीटी चित्रपटाचा टिझर आज रिलीज झाला. यामध्ये मुख्य भूमिका असलेल्या अभिनेत्री करिना कपूरचा पहिला लूक देखील चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. करिनाचा 'जाने जान' या OTT वेब चित्रपट पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येणार आहे. यासंदर्भातील पोस्ट करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवरून केली आहे. (Jaane Jaan Teaser)
करिना कपूरने या चित्रपटाच्या टिझरसह एक संदेशही तिच्या चाहत्यांना दिला आहे. हा दिवस करिना कपूरसाठी खास आहे कारण याच दिवशी तिचा वाढदिवस आहे. त्यामुळे करिनाने इन्स्टावरून म्हटले आहे की, 'जाने जान येत आहे ✨ तुमच्या जाने जानच्या वाढदिवसा दिवशी'. दुसर्याकडून परिपूर्ण भेटवस्तूची वाट न पाहता तुमच्या कॅलेंडरवर तारीख चिन्हांकित करा. #JaaneJaan 21 सप्टेंबर रोजी येत आहे, फक्त Netflix वर! असेही करिना कपूरने म्हटले आहे.
सुजॉय घोष दिग्दर्शित 'जाने जान' हा चित्रपट Netflix वर 21 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये करीना कपूर खान, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात करीना कपूर एका पूर्णपणे नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ती आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर विजय वर्मा एका देखण्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.