Latest
ISRO-NASA : मोदी-बायडन भेटीत मोठा निर्णय! भारत-अमेरिका एकत्रित अवकाशात पाठवणार अंतराळवीर
पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत लवकरच आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणार आहे. त्यामुळे इथून पुढे अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश मिळून अवकाशातील मोहिमा राबवतील. ओव्हल ऑफिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या भेटीपूर्वी अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
याआधी अमेरिकेत बाह्य अवकाश करार 1967 अंतर्गत करार झाले होते. पण आर्टेमिस अॅकॉर्ड्स हे 21 व्या शतकातील अवकाशातील मोहीम संदर्भातील नवे नियम आहेत. नवनवीन प्रयोग करण्यासाठी या अंतर्गत भारत आणि अमेरिका पुढील वर्षी अवकाश स्थानकावर संयुक्त मोहीम राबवणार आहेत.
हेही वाचा
- PM Modi America Visit : नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते का आहेत? जाणून घ्या 'न्यूयॉर्क टाइम्स' रिपोर्टमधील कारण
- PM Modi Gifts : महाराष्ट्राचा गूळ, गुजरातचे मीठ…जाणून घ्या पीएम मोदींनी बायडेन दाम्पत्याला दिलेल्या 'खास भेटवस्तू'
- Modi visit Musk : 'मी मोदींचा फॅन' अमेरिका भेटीत एलॉन मस्क यांनी केली मोदींची स्तुती म्हणाले…

