चीनला झोंबली इस्‍त्रायलची कारवाई, परराष्‍ट्र मंत्री म्‍हणाले, “गाझामधील……”

चीनला झोंबली इस्‍त्रायलची कारवाई, परराष्‍ट्र मंत्री म्‍हणाले, “गाझामधील……”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडल्‍याने जगाचे टेन्‍शन वाढलं आहे. मागील सात दिवसांच्‍या संघर्षामध्‍ये इस्रायलमधील मृतांची संख्या साडेतीन हजार पार गेली आहे. हमासने केलेल्‍या भीषण हल्‍ल्‍यानंतर इस्‍त्रायलनेही चोख प्रत्‍युत्तर दिले आहे. मात्र इस्‍त्रायलने हमासवर केलेली कारवाई चीनला झोंबली आहे. चीनचे परराष्‍ट्र मंत्री (Chinese Foreign Minister) वांग यी यांनी या कारवाईवर टीका केली आहे.

Chinese Foreign Minister : 'स्व-संरक्षणाची व्याप्ती' ओलांडली

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्‍हटले आहे की, गाझामध्‍ये इस्‍त्रायल लष्कराने केलेली कारवाई ही 'स्व-संरक्षणाची व्याप्ती' ओलांडली आहे. गाझामधील लोकांना देण्‍यात येणारी सामूहिक शिक्षा आता संपवावी, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. इस्त्रायल-हमास संघर्षासंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी त्यांच्याशी फोनवरु चर्चा केल्‍यानंतर त्‍याचे हे वक्तव्य आले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्री वांग यी यांनी शनिवारी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहाद यांच्‍याशी फोनवर चर्चा केली. "सर्व पक्षांनी परिस्थिती वाढवण्यासाठी कोणतीही कारवाई करू नये आणि शक्य तितक्या लवकर वाटाघाटी टेबलवर परतले पाहिजे," असे वांग यी यांनी सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांना सांगितले.

चीनचे राजदूत  देणार मध्यपूर्वेला भेट

चीन सरकारने दिलेल्‍या माहितीनुसार, इस्रायल-हमास संघर्षात युद्धविराम आणि शांतता चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी चीनचे राजदूत झाई जून पुढील आठवड्यात मध्यपूर्वेला भेट देणार आहेत. शुक्रवारी, परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की, इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष सोडवण्याचा योग्य मार्ग म्हणजे "दोन-राज्य समाधान" पुढे जाणे आणि शक्य तितक्या लवकर शांतता चर्चा पुन्हा सुरू करणे. पॅलेस्टिनी प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे, असेही ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाने "संबंधित पक्षांना शांत राहण्याचे, संयम बाळगण्याचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून ताबडतोब शत्रुत्व संपवण्याचे" आवाहन केले. दरम्यान, इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा बीमजिंगने "स्पष्ट निषेध न केल्याने" इस्रायलने "खूप निराशा" व्यक्त केली. चीनची भूमिका "गेल्या काही दिवसांत घडलेल्या शोकांतिका आणि भीतींशी विसंगत आणि असत्य" होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news