

तेल अविव वृत्तसंस्था : गाझा पट्टीला हमासच्या दहशतवाद्यांची दफनभूमी बनविण्यासाठी इस्त्रायली सैन्य दलाने तयारी केली आहे. गाझा पट्टीनजीक रणगाडे, शस्त्रास्त्रासह मोठ्या फौजफाट्यासह इस्रायल सैनिकांनी कुमक तैनात केली आहे. हॉवत्झर तोफाही तैनात करण्यात आल्या असून, यामधून गाझाच्या दिशेने तोफगोळ्यांनी हल्ला केला जात आहे. शनिवारी आठव्या दिवशी इस्रायल सैनिकांनी गाझाच्या सीमेजवळ मोर्चेबांधणी केली असून हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. (Israel-Hamas war)
गेल्या चोवीस तासांत इस्रायल सैन्य दलाने केलेल्या हल्ल्यात ३४४ ठार झाल्याचा दावा हमास या दहशतवादी संघटनेने केला आहे. कारवाईदरम्यान इस्रायलच्या सैन्यदलास गाझामध्य हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांचे मृतदेह सापडले. हमासच्या हवाई दलाचा प्रमुख मुराद अबू मुराद याला ठार करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्य दलाने केली आहे.
दोन दिवसांपासून हमास इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले आहे. इस्रायली फौजा गाझा पट्टीत घुसल्या असून, हमासच्या तळांना जोरदार हल्ले केले जात आहे. यामध्ये हमासचा हवाई मोहिमेचा कमांडर ठार झाला. आतापर्यंत या युद्धात ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्रायलमधील १३०० नागरिकांचा समावेश आहे. तर गाझा पट्टीतील १५०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या कारवाईत गाझातील २२१५ र झाले असून, यामध्ये मुलांचाही समावेश आहे. (Israel-Hamas war)
दरम्यान, लेबेनॉनमधून काही दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्रायली सैनिकांनी ड्रोन हल्ले करून घुसखोरांना कंठस्नान घातले. दरम्यान, हमासचे दहशतवादी इसिस आणि अल कायद्यापेक्षा घातक असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. हमासच्या नरसंहारच्या कृत्यामुळे आम्ही इस्रायलच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
• वैत, इराण, इराक, जॉर्डन, बहारीन आदी देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील नागरिकांचा बळी गेल्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देशांनी इस्रायलचा निषेध केला आहे. युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे.
• रॉयटर्स, एएफबी, अल जझिरा आदी वृत्तसंस्थाचे पत्रकार लेबेनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या पत्रकाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
• गाझामध्ये जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची संख्या तोकडी पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Israel-Hamas war)
हेही वाचा :