

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) आपला सहकारी अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचा (Kartik Aaryan) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यापासून क्रिती सेनन अधिकच चर्चेत आली आहे. सर्वत्र अशी चर्चा सुरु आहे की क्रिती सेनन 'भूल भुलैया २'चा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट (Kriti anon dating Kartik Aaryan) करत आहे. नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेननने कार्तिक आर्यनसोबतच्या अफेअरच्या अफवांवर मौन सोडले.
अलीकडेच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत क्रितीने या अफवांबद्दल सांगितले की, 'लोकांना नेहमी अशा प्रकरणानंतर अधिक जाणून घेण्याची इच्छा असते.' क्रिती पुढे म्हणाली, सोशल मीडिया आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट, हे मला अजूनही माहित नाही. पण मी अशा अफवांना घाबरत नाही. या अफवांनंतर क्रितीला असे वाटते आहे की, खरच माझे आयुष्य इतके मनोरंजक असायला हवे होते, जितके अशा गोष्टीवरुन ते इतरांना असेच आहे असे वाटते. पण, तिने यावेळी मुलाखतीत स्पष्ट केले की आपण कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये नाही.
बॉलिवूडमध्ये क्रिती सध्या आघाडी सिनेतारका आहे. तसेच तिच्या अनेक चित्रपटातील कामांचे कौतुक देखील करण्यात आले. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये क्रितीकडे सध्या भरपूर प्रोजेक्टस् आहेत. क्रिती लवकरच अभिनेता टायगर श्रॉफच्या 'गणपत : पार्ट वन' आणि वरुण धवनसोबत 'भेडिया'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे प्रभासचा 'आदीपुरुष' हा चित्रपटही आहे. या चित्रपटात क्रिती 'सीते'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.