khatija rahman : ए आर रहमान यांची मुलगी खतिजा विवाहबध्द | पुढारी

khatija rahman : ए आर रहमान यांची मुलगी खतिजा विवाहबध्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची मुलगी खतिजा (khatija rahman ) हिचे लग्न झाले आहे. खुद्द ए आर रहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. फोटो शेअर करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे (khatija rahman ) लग्न रियासदीन रियानसोबत झाले आहे. त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये नववधू खतिजा आणि तिचा पती सोफ्यावर एकत्र बसलेले दिसत आहेत.

या फोटोत संगीतकार रहमान आपल्या मुलीच्या मागे उभा आहे. रहमान यांचा जावई व्यवसायाने साऊंड इंजिनिअर आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत रहमान यांनी लिहिले, ‘देव या नवीन जोडप्याला आशीर्वाद देवो, सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आगाऊ धन्यवाद.’ ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यावर दोन लाखांहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. त्याचबरोबर नेटकरी कमेंट करून नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स दिल्या आहेत. विवाहित जोडप्याला शुभेच्छा आणि प्रेम देत आहेत. यावर लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने प्रतिक्रिया दिलीय की- ‘खतिजा आणि रियासदीन रियानचे हार्दिक अभिनंदन. देव या सुंदर जोडप्याला आशीर्वाद देवो.’

जाणून घ्या खतीजाविषयी

खतीजा रहमान गायिका आहे. ती २५ वर्षांची आहे. इंग्रजी माध्यमातून तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.

रियासदीन रियान कोण आहे?

खतीजाचे पती रियासदीन रियान यांचं पूर्ण नाव रियासदीन शेख मोहम्मद म्हटलं जात आहे. . रियास एक साऊंड इंजिनियर आहे. त्याने रहमान यांच्यासोबत काम केले आहे. २०१७ मध्ये दोघांनी सोबत काम सुरु केले. दोघे सोबत लाईव्ह शो आणि परफॉर्मन्स देतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

एका यूजरने लिहिले की, ‘नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन सर, तुमच्या परिवाराला शुभेच्छा.’ आणखी एका युजरने लिहिले, खूप सुंदर कौटुंबिक चित्र. सर्वशक्तिमान अल्लाह खतिजा रहमान दीदी आणि रियासदीन भाई या दोघांनाही नेहमी आशीर्वाद देवो…आमीन…
याआधी खतिजा यांच्या वाढदिवशी तिचा रियासदीनसोबत साखरपुडा झाला होता. खतिजा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की, मला हे कळवताना आनंद होत आहे की, रियासदीन एक उद्योजक आणि ऑडिओ अभियंता आहे. २९ डिसेंबर रोजी झालेल्या या साखरपुड्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman)

 

View this post on Instagram

 

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman)

Back to top button