ENG vs IRE Test : टॉयलेटला जाण्यासाठी विकेटकीपरने घेतला DRS! इंग्लंड-आयर्लंड कसोटीतील ‘त्या’ घटनेची जोरदार चर्चा

ENG vs IRE Test : टॉयलेटला जाण्यासाठी विकेटकीपरने घेतला DRS! इंग्लंड-आयर्लंड कसोटीतील ‘त्या’ घटनेची जोरदार चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENG vs IRE Test : क्रिकेट हा जगातील सर्वात प्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट जगतात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्याची जगभरात चर्चा सुरू होते. अशीच एक घटना इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाली. वास्तविक, आयर्लंडच्या यष्टीरक्षकाने टॉयलेटला जाण्यासाठी डीएसआरचा (DRS) वापर केला. त्यानंतर या घटनेची जगभरात जोरदार चर्चा होत असून चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॉयलेटला जाण्यासाठी घेतला डीआरएस

क्रिकेटच्या खेळात डीआरएस नियमाला खूप महत्त्व आहे. सामन्याचा निकाल फिरवण्याची या नियमात मोठी क्षमता आहे. प्रतिस्पर्धी संघ योग्यवेळी डीआरएसचा निर्णय घेऊन गमावलेला सामना जिंकू शकतो. पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आयर्लंडच्या यष्टिरक्षकाने चक्क टॉयलेटला जाण्यासाठी डीआरएसचा वापर केल्याचे समोर आले आहे.

लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी आयर्लंडचा पहिला डाव 172 धावांत गुंडाळला त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी झंझावाती सुरुवात केली. दुस-या दिवशी यजमान संघाने साडेतीनशे धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर धावसंख्या 2 बाद 378 असताना मैदानावर जो रुट आणि ऑली पोप खेळत होते. त्यावेळी 63. व्या षटकात रिव्हर्स शॉट खेळताना जो रूटच्या पॅडवर चेंडू आदळला. आयर्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यानंतर आयरिश खेळाडूंनी डीआरएस घेतला. तिस-या पंचांनी रूट पायचित आहे की नाही हे तपासले आणि आपला निर्णय देत मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयानंतर आयर्लंडची गोलंदाजी पुन्हा सुरू झाली पण यावेळी त्यांचा यष्टिरक्षक मैदानातून गायब असल्याचे पहायला मिळाले. तो काही वेळाने मैदानात परतला. त्यावेळी समजले की, आयर्लंडच्या यष्टीरक्षकाने चक्क टॉयलेटमध्ये जाण्यासाठी त्या डीआरएसचा वापर केला होता.

इंग्लंडचा 10 विकेट्स राखून विजय

इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत आयर्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. टॉस गमावल्यानंतर आयर्लंडचा पहिला डाव 172 धावांत गारद झाला. त्यानंतर इंग्लंडने पहिला डाव 4 बाद 524 धावा फटकावल्या. 352 धावांच्या पिछाडीनंतर प्रत्युत्तरात खेळताना आयर्लंडने आपल्या दुस-या डावात झुंज दिली. मॅकब्रायन (नाबाद 86), अडायरने (88), हॅरी टेक्टर (51), टकर (44) यांच्या संघर्षमय खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने 362 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला केवळ 11 धावांचे लक्ष्य मिळाले, जे यजमान संघाने केवळ चार चेंडूत गाठले आणि सामना खिशात घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news