IPL FINAL 2023
Latest
IPL FINAL 2023 : खेळ पावसाचा! आज पाऊस न थांबल्यास ‘हे’ आहेत पर्याय
पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा आयपीएलच्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. वास्तविक टॉस ७. वा होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. आता सामन्याचे काय होणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. जाणून घेऊया फायनलसाठी असणाऱ्या पर्यायाविषयी …
- (IPL FINAL, Narendra Modi Stadium, IPL 2023, GT vs CSK)
खालील पर्याय असतील
- आयपीएल 2023 चा अंतिम सामना कट ऑफ वेळ 12:26 वाजेपर्यंत असेल.
- सामना साडेनऊ पर्यंत सुरु झाल्यास षटक (ओव्हरर्स) कमी केले जाणार नाहीत. सामना २० षटकांचाचं होईल.
- सामना सुरु असताना सुरु झाल्यास पूर्ण एक डाव आणि दुसऱ्या डावातील ५ षटकांचा खेळ झाल्यानंतरचं डकवर्थ लुईस नियम लागू होईल, तोपर्यंत होणार नाही.
- आज अखेर १२.२६ मिनीटांपर्यंत पाऊस थांबला नाही आणि सुपर ओव्हरही झाली नाही तर कट ऑफ वेळेनंतर पाऊस सुरू राहिल्यास पंच सुपर ओव्हरचा निर्णय घेतील.
- आज सामना झालाच नाही तर उद्या फायनलसाठी राखीव दिवस असेल याचा अर्थ आजचा दिवस पावसामुळे वाया गेल्यास उद्या फायनल सामना होईल.
- (IPL FINAL, Narendra Modi Stadium, IPL 2023, GT vs CSK)

