पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स असा रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्सला दुसरा धक्का, मॅथ्यू वेड बाद
ट्रेंट बोल्टने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का दिला आहे. मॅथ्यू वेड १० चेंडूमध्ये ८ धावा करत तंबूत परतला.
राजस्थान रॉयल्सला सातवा धक्का, ट्रेंट बोल्ट बाद
रवी श्रीनिवासन किशोरने राजस्थान रॉयल्सला सातवा धक्का दिला. ट्रेंट बोल्ट ७ चेंडूमध्ये ११ धावा करत झेलबाद झाला
राजस्थान रॉयल्सला सहावा धक्का, आर अश्विन बाद
रवी श्रीनिवासनने राजस्थान रॉयल्सला सहावा धक्का दिला आहे. रवी अश्विन ९ चेंडूमध्ये ६ धावा करत माघारी परतला. राजस्थान रॉयल्सचा स्कोर १६ षटकांअखेर ९८ धावा इतका आहे.
राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ तंबूत परतला, हेटमायर बाद
ह्रार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सला पाचवा धक्का दिला आहे. शिमरॉन हेटमायर १२ चेंडूमध्ये ११ धावा करत माघारी परतला. हार्दिक पंड्याने शिमरॉन हेटमायरला झेलबाद केले. हार्दिक पंड्याने ३ विकेट्स घेत राजस्थानच्या धावांची गती अतिशय संथ केली आहे.
हार्दिक पंड्याने केली बटलरची बत्ती गुल
हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का दिला आहे. जोस बटलर ३५ चेंडूमध्ये ३९ धावांची केली आहे. हार्दिकने राजस्थानच्या प्रमुख फलंदाजांना बाद केले आहे. जोस बटलर आणि संजू सॅमसनला हार्दिक पंड्याने बाद केले आहे. राजस्थान रॉयल्सचा स्कोर १४ षटकांअखेर ८४ इतका आहे.
राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का, देवदत्त पडिकल तंबूत परला
राशिद खानने राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का दिला आहे. देवदत्त पडिकल १० चेंडूमध्ये २ धावा करत स्वस्तात माघारी परतला. राजस्थान रॉयल्सचा स्कोर १२ षटकांअखेर ७९ धावा इतका आहे.
राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का, संजू सॅमसन बाद
हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का दिला आहे. कर्णधार संजू सॅमसने ११ चेंडूमध्ये १४ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सचा स्कोर ८.४ षटकांअखेर ६० धावा इतका आहे.
राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का
राजस्थान रॉयल्सने सावध सुरूवात केल्यानंतर गुजरातने राजस्थान चौथ्या षटकात पहिला धक्का दिला आहे. यशस्वी जयस्वालला यश दयालने बाद केले आहे. यशस्वी जयस्वाल १६ चेंडूमध्ये २२ धावा करत तंबूत परतला. राजस्थान रॉयल्सचा स्कोर चार षटकांअखेर ३२ इतका आहे.
आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यासाठी २००८ च्या चॅम्पियन संघातील काही खेळाडू उपस्थित राहणार आहेत. राजस्थान रॉयलच्या संघाने या खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. मुनाफ पेटल, युसुफ पठाण, रविंद्र जडेजा, स्वप्नील असनोलकर, दिनेश साळुंखे, सिद्धार्थ त्रिवेदी हे २००८ सालच्या चॅम्पियन संघातील खेळाडू आजचा फायनल सामना पाहण्यासाठी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत. (IPL Final)
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.