Venkatesh-Avesh : व्यंकटेश अय्यर-आवेश खानचा ‘अरेबिक कुथु’ डान्स व्हायरल! (Video)

Venkatesh-Avesh : ‘अरेबिक कुथु हबीबो’ गाण्यावर व्यंकटेश अय्यर-आवेश खान थिरकले (Video)
Venkatesh-Avesh : ‘अरेबिक कुथु हबीबो’ गाण्यावर व्यंकटेश अय्यर-आवेश खान थिरकले (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत जेतेपदासाठी सर्वच संघ नेटमध्ये जोरदार घाम गाळत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा आवेश खान हे 'अरेबिक कुथु हबीबो' या हिट गाण्यावर ठुमके लगावत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. व्यंकटेश अय्यरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडू अरेबिक कुथू, हलमिथी हबीबो या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. (Venkatesh-Avesh)

टीम इंडियाचे युवा स्टार खेळाडू व्यंकटेश आणि आवेश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे साऊथचा सुपरस्टार विजयच्या आगामी 'बीस्ट' चित्रपटातील आहे. या गाण्यावर सेलिब्रिटी खूप व्हिडिओ रिल्स बनवत आहेत. अय्यर आणि आवेश यांनाही या गाण्यावर व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही. दोघेही या गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करताना दिसत आहेत. वेंकटेशने व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, 'पहिल्याच टेकमध्ये डान्स स्टेप्स करण्यात मला यश आले.' (Venkatesh-Avesh)

यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या गाण्यावर परफॉर्म केले होते. नवीन आयपीएल 2022 फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यंकटेश आणि आवेशच्या 'बिजली बिजली' गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये हे दोन्ही खेळाडू एका तिसऱ्या व्यक्तीसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना लखनऊ सुपर जायंट्सने 'एक दम पॉवर परफॉर्मन्स' अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Venkatesh-Avesh)

वेंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 8 कोटी रुपयांना रिटेन केले आहे. या खेळाडूला 2021 मध्ये KKR ने केवळ 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते, परंतु या खेळाडूची स्पर्धेदरम्यानची दमदार कामगिरी पाहून संघाने मोठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला. अय्यरने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात 370 धावा केल्या. पहिल्या टप्प्यात संथ सुरुवात केल्यानंतर कोलकाता संघाने जो वेग पकडला त्यात अय्यरचा मोठा वाटा होता. या डावखुऱ्या फलंदाजाच्या खेळीने अनेक क्रिकेट चाहते प्रभावित झाले. (Venkatesh-Avesh)

दुसरीकडे, आवेश खानबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सने त्याला लिलावापूर्वी रिलिज केले होते. अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या संघात या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात स्वारस्य दाखवले. अखेरीस लखनौ सुपर जायंट्सने त्याला १० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आवेश खान दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 16 सामन्यात 24 विकेट घेतल्या. (Venkatesh-Avesh)

इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. एकूण 70 लीग सामने होतील. हे सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news