MS Dhoni : 7 नंबरची जर्सी परिधान करण्यावरून धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला…

MS Dhoni : 7 नंबरची जर्सी परिधान करण्यावरून धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला...
MS Dhoni : 7 नंबरची जर्सी परिधान करण्यावरून धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला...
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रीडाविश्वात खेळाडूंची ओळख त्यांच्या कामगिरीवरून, त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्यातील वादांवरून होते. अनेक खेळाडूंचा जर्सी क्रमांकही त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय संस्मरणीय ठरतो आणि सहसा खेळाडूंना विशिष्ट कारणासाठी किंवा त्यांच्या आवडीनुसार जर्सी क्रमांक निवडणे आवडते. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या कामगिरीमुळे, नावामुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची 7 नंबरची जर्सी देखील खूप प्रसिद्ध आहे. धोनीने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आधी आपण 7 नंबरचीच जर्सी का निवडली? यामागचे एक मोठे गुपित त्याने उघड केले आहे. तसेच या निवडीमागे अंधश्रद्ध नसल्याचा खुलासाही त्याने केला आहे.

अनेकदा खेळाडू आपला जर्सी क्रमांक खूप विचारपूर्वक निवडताना दिसतात. कोणत्याही खेळाडूला त्याच्या जर्सीवर भाग्यवान क्रमांक हवा असतो, जो खेळाडूंचे खूप लक्ष वेधून घेतो. काहीवेळा, हे माफक आकडे अगदी चकचकीत बनतात आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)च्या 7 नंबरच्या जर्सीमध्येही असेच दिसून आले आहे. पण आता धोनीनेच खुलासा केला आहे की, त्याने 7 नंबरची निवड का केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात धोनी (MS Dhoni) म्हणाला, 'बर्‍याच लोकांना सुरुवातीला वाटले की 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे, पण मी तो अगदी सोप्या कारणासाठी निवडला. माझा जन्म 7 जुलै रोजी झाला. त्यामुळे सातव्या महिन्याचा सातवा दिवस आहे आणि त्यामुळेच या नंबरची मी निवड केली.'

धोनी (MS Dhoni) म्हणाला, 'बरेच लोक म्हणाले की 7 हा न्यूट्रल नंबर आहे आणि जरी तो तुमच्यासाठी काम करत नसला तरी तो तुमच्या विरोधात जात नाही.' कॅप्टन कूलच्या मुद्द्यावरून हे स्पष्ट होते की त्यांने कोणत्याही अंधश्रद्धेतून 7 हा नंबर निवडला नाही तर त्यांच्या वाढदिवसाची तारीख आणि महिन्यानुसार निवड केली आहे.

या वर्षी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)च्या नेतृत्वाखाली मैदानात दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके (CSK)ने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईने यंदाची म्हणजेच २०२२ ची आयपीएल ट्रॉफी जिंकली तर ते पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी करतील. धोनीने कर्णधार म्हणूनही भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३ वेळा आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news