Ravi Shastri : जसप्रीत बुमराहच्या IPL मधील निराशाजनक कामगिरीवरून शास्त्रींचे मोठे विधान

Ravi Shastri : जसप्रीत बुमराहच्या IPL मधील निराशाजनक कामगिरीवरून शास्त्रींचे मोठे विधान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्याची गोलंदाजी अजिबात प्रभावी दिसलेली नाही. आता या मोसमातील बुमराहच्या या सुमार कामगिरीबद्दल टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले की, बुमराहची खराब कामगिरी चिंतेचे कारण नाही आणि त्याला दुसऱ्या टोकाकडून इतर गोलंदाजांची साथ मिळत नाहीय. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बुमराहविरुद्ध बचावात्मक पवित्रा घेतात, याचा परिणाम त्याला विकेट मिळवणे अवघड जाते, असे शास्त्रींनी म्हटले आहे.

बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल मोसमात त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 60.80 च्या सरासरीने आणि 7.93 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या 6 सामन्यात त्याला फक्त 2 विकेट घेता आल्या आहेत. (Ravi Shastri)

रवी शास्त्री म्हणाले की, बुमराहला विकेट न मिळण्यामागील कारण म्हणजे तो खूप चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही गोलंदाजाची योग्य साथ मिळत नाही. या हंगामात बुमराहने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि मागील 6 सामन्यांमध्ये त्याला केवळ 2 विकेट्स मिळाल्या आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना शास्त्री म्हणाले की, बुमराहच्या फॉर्मबद्दल फारशी चिंता नाही, फरक एवढाच आहे की प्रतिस्पर्धी संघ त्याला वेगळ्या पद्धतीने खेळत असून त्याच्या मा-यापुढे सावधगिरीने फलंदाजी करत आहेत. त्यामुळे बुमराहला विकेट मिळवण्यात अपयश येत आहे. (Ravi Shastri)

मुंबईचा स्टार गोलंदाज बुमराहच्या या मोसमातील खराब कामगिरीचा परिणाम संघावरही झाला आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या संघाने आत्तापर्यंत 10 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दोनच सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आला आहे. या विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचे सध्या केवळ 4 गुण झाले आहेत. गुणतालिकेत हा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. (Ravi Shastri)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news