Moeen Ali : सीएसकेला मोठा झटका, मोईन अली संघातून बाहेर!

Moeen Ali : सीएसकेला मोठा झटका, मोईन अली संघातून बाहेर!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 मधील पराभवाचा सिलसिला थांबवू न शकलेल्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK) एक मोठा धक्का बसला आहे. सीनियर खेळाडू मोईन अली (Moeen Ali) पुढील काही सामन्यांमध्ये संघाबाहेर असणार आहे. मात्र, तो आठवडाभरात दुखापतीतून बरा होईल, अशी आशा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केली आहे.

मोईन अली (Moeen Ali) प्रशिक्षणादरम्यान जखमी

मोईन अलीला शनिवारी (दि. 23) प्रशिक्षण सत्रादरम्यान घोट्याला दुखापत झाली आणि याच कारणास्तव तो पंजाब किंग्जविरुद्धचा सामना खेळू शकला नाही, ज्यामध्ये सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव झाला. मोईनने 17 एप्रिल रोजी सुपर किंग्जकडून शेवटचा सामना खेळला होता आणि या सामन्यातही संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

फ्लेमिंग म्हणाला, सरावा दरम्यान मोईन अलीचा (Moeen Ali) घोटा मुरगळला आणि दुखापत झाली. नंतर एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर नसल्याचे दिसून आले. परंतु बरे होण्यास वेळ लागेल, कदाचित सात दिवसांहून अधिक वेळ लागेल. सुदैवाने फ्रॅक्चर नाही. त्यामुळे तो लवकर बरा होईल अशी आशा आहे. गेल्या मोसमात विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईच्या संघाचा प्रमुख सदस्य असलेला मोईन सध्याच्या हंगामात बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत संघर्ष करत आहे.

मोईन अलीचा खराब फॉर्म

मोईन अलीने (Moeen Ali) आतापर्यंत 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. ज्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 48 धावा केल्या आहेत. त्याला आतापर्यंत आठ षटकांत एकही बळी घेता आलेला नाही. सुपर किंग्जचा संघ सध्याच्या हंगामात दुखापतींशी झुंज देत आहे.

पराभवासोबतच सीएसके संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त

सीएसकेचे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि अॅडम मिल्ने दुखापतींमुळे याआधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. सोमवारी क्षेत्ररक्षण करताना अंबाती रायडूच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आणि त्याला उपचार घ्यावे लागले. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर रायुडूने 39 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह 78 धावांची खेळी खेळून सुपर किंग्जला सामन्यात विजय मिळवून दिला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. (Moeen Ali)

रायुडूच्या दुखापतीबाबत फ्लेमिंग यांनी सांगितले की, जेव्हा त्याने ब्रेक दरम्यान पाहिले तेव्हा त्याच्या हातावर ओरखडे होते. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. हा तोच हात होता जो काही काळापूर्वी फ्रॅक्चर झाला होता, ही दुखापत अजूनही ताजी आहे. अशा खेळीमुळे नक्कीच अंबाती आणि सीएसके संघाचे नुकसान होऊ शकते. (Moeen Ali)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news