Hyderabad vs LSG : हैदराबादची पराभवाची मालिका कायम; लखनौचा १२ धावांनी विजय

Hyderabad vs LSG : हैदराबादची पराभवाची मालिका कायम; लखनौचा १२ धावांनी विजय
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सनरायजर्स हैदराबाद (Hyderabad vs LSG) संघाच्या पराभवाची मालिका यंदाचा हंगामातही कायम असल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले. एका वेळी हैदराबाद सहज जिंकेल असे वाटत असताना त्यांना पुन्हा पराभवाला समोरे जावे लागले. लखनौचा गोलंदाज आवेश खान याने टाकलेले १८ व्या षटकाने सामन्याचा निकाल बदलला. निकोलस पुरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जोडी जमलेली असताना आवेश खानने निकोलस पुरन आणि त्याच्या नंतर आलेल्या अब्दुल समदला पाठोपाठ बाद करुन सामना लखनौच्या पारड्यात झुकवला. अखेर सुंदरला काही करता आले नाही. शेवटच्या षटकात जेसन होल्डर याने तीन वीकेट घेत लखनौचा विजय निश्चित केला.

लखनौ सुपर जायंटसने (Hyderabad vs LSG) दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाची सुरुवात देखिल फारशी चांगली झाली नाही. चौथ्या षटकात कर्णधार केन विल्यमसन अवघ्या १६ धावांवर (चेंडू १६) बाद झाला. तसेच त्याचा दुसरा साथिदार अभिषेक शर्मा देखिल त्याच्या पाठोपाठ १३ धावांवर (चेंडू ११) बाद झाला. राहूल त्रिपाठीने काही काळ संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्याने मार्करम सोबत छोटी भागिदारी देखिल रचली. पण, मार्करमला या सामन्यात फारसा प्रभाव दाखवता आला नाही. एडन मार्करम १२ धावांवर (चेंडू १४) बाद झाला. मार्करम नंतर राहूल त्रिपाठी देखिल ४४ धावांची (चेंडू ३०) खेळी करुन माघारी परतला. यानंतर निकोलस पुरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

सनरायजर्सचे (Hyderabad vs LSG) फलंदाज ठराविक अंतरावर बाद होते. त्यांना मोठी खेळी करता आली नाही. पण, ते सामन्यात कायम होते. निकोलस पुरन याने काही मोठे फटके खेळत हैदराबादच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. वॉशिंग्टन देखिल एकेरी दुहेरी धावा घेत त्याला साथ देत होता. हैदराबादला जिंकण्यासाठी १० च्या रनरेटने धावांची आवश्यकता होती. पण, १५ व्या षटकानंतर लखनौच्या गालंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. रवी बिश्नोईने १६ वे आणि अँड्र्यू टायने १७ वे षटक टाकत चांगली गोलंदाजी केली. १८ व्या षटकात आवेश खान गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर निकोलस पूरनने षटकार ठोकला. तसेच तिसऱ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात सीमारेषेवर निकोलस पुरन ३४ धावांवर (चेंडू २४) झेल देऊन बाद झाला. आवेशने पुढच्या चेंडूवर अब्दुल समद या नव्या फलंदाजाला किपरकडे झेल द्यायला भाग पाडले. एकापाठोपाठ दोन फलंदाज बाद झाल्याने हैदराबादने सामना इथेच गमावला.

वॉशिंग्टन सुंदरला (Hyderabad vs LSG) सुद्धा फार काही करता आले नाही. तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच्या बॅटला बॉल चांगला लागत नव्हता. अखेर जेसन होल्डर याने शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर (१४ चेंडूत १८ धावा), भूवनेश्वर कुमार आणि रोमॅरियो शेफर्ड या तिघांना बाद करत लखनौ सुपर जायंटसने १२ धावांनी सामना जिंकला. आवेश खान याने या सामन्यात चार बळी घेतले. तर जेसन होल्डरने तीन बळी मिळवले. तसेच कृणाल पंड्याला दोन बळी मिळवण्यात यश आले.

तत्पुर्वी, पहिल्या पाच षटकात तीन फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार केएल राहूल याने संघाला सावरत पडझड रोखून भक्कम धावसंख्या उभारली. केएल राहूल आणि दीपक हुडाच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि युवा फलंदाज आयुष बडोनी याने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फलंदाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंटसला १६९ धावसंख्या गाठता आली.

हैदराबाद (Hyderabad vs LSG) संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय हैदराबादसाठी चांगलाच लाभला. पहिल्या पाच षटकात लखनौचे तीन फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांनी माघारी धाडल्याने हैदराबादने सामन्यावर चांगलीच पकड जमवली. मात्र त्यानंतर कर्णधार केएल राहूल आणि फलंदाज दीपक हुडा यांनी लखनौला सावरले. दोघांनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. दीपक हुडाने अवघ्या ३३ चेंडूत ५१ धावा करुन बाद झाला. दीपकने आपल्या खेळीत ३ षटकार आणि ३ चौकार लगावले. तर कर्णधार केएल राहूल याने ५० चेंडूत ६८ धावा केल्या. तर राहूलने आपल्या खेळीत ६ चौकारांसह १ षटकार लगावला.

यानंतर शेवटच्या षटकांमध्ये आयुष बडोनी (१२ चेंडूत १९ धावा) आणि जेसन होल्डर (३ चेंडूत ८ धावा) यांच्या फटकेबाजीमुळे लखनौने ७ बाद १६९ धावसंख्या उभारली. तत्पुर्वी सलामीवीर क्विंटन डिकॉक (४ चेंडूत १ धाव), एविन लुईस (५ चेंडूत १ धाव) आणि मनिष पांडे (१० चेंडूत ११ धावा) हे पहिल्या पाच षटकात एकापाठोपाठ एक तंबुत परतले. यामुळे लखनौचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. हैदराबाद कडून वॉशिंगटन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड आणि टी नटराजन यांनी आपल्या चार षटकात प्रत्येकी २ गडी बाद केले. सुरुवातीच्या १० षटकात हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगलीच पकड निर्माण केली होती. नंतर मात्र त्यांना ती पकड कायम ठेवता आली नाही.

सनरायझर्स हैदराबाद संघ 

राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

लखनऊ सुपर जायंट्स संघ

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news