पुढारी ऑनलाईन डेस्क : डायनासोरचं नवं जिवाश्म : ब्रिटनमधील आईल ऑफ विट या परिसरात डायनासोरचे जिवाश्म मिळाले आहेत. डायनासोरच्या या प्रजातीचे नामकरण हेल हेरॉन असं करण्यात आलं आहे. साडे बारा कोटी वर्षांपूर्वी हे डायनासोर या परिसरात वावरत होते. माणसा इतका मोठा प्राणी एका घासात खाऊन संपवेल इतके हे डायनसोर मोठे होते, असा कयास संशोधकांनी केला आहे. या डायनासोरची लांबी ३० फूट इतकी असावी, असा अंदाज जिवाश्मांच्या अभ्यासातून लावण्यात आला आहे.
या डायनासोरची शिकार करण्याची पद्धत आताच्या हेरॉन पक्ष्यासारखी होती.
मिळालेल्या हाडांची संख्या ही ५० पेक्षाही जास्त आहे.
नील जे गोस्टिंग यांनी या संद्रभातील माहिती दिलेली आहे. ते म्हणाले त्या काळात हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने किती समृद्ध होता, याची परिचित या शोधातून येते.
विशेष म्हणजे या डायनासोरचं तोंड आताच्या मगरींसारखं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे.
या परिसरात डायनोरचं आणखी एक जिवाश्म मिळाले असून या प्रजातीचं नामकरण मिलनर्स रिव्हर बँक हंटर असं करण्यात आलं आहे.