Elon Musk's Daughter : अब्जाधीश मस्कची मुलगी कंगाल! भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य, स्वतःच उघड केले कारण
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला-स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांची मोठी मुलगी व्हिव्हियन विल्सन सध्या आर्थिक अडचणीत आहे. ती सध्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन रूममेट्ससोबत राहत आहे. आता हे वाचून आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही माहिती स्वतः व्हिव्हियनने एका मुलाखतीत उघड केली आहे.
व्हिव्हियनला अतिश्रीमंत व्हायचे नाही
व्हिव्हियन विल्सनने सार्वजनिकपणे आपले वडील एलन मस्क यांच्यापासून संबंध तोडले आहेत. तिने सांगितले की ती सध्या पूर्णपणे कंगाल आहे, पण तरीही तिला जास्त श्रीमंत होण्याची इच्छा नाही. ती लॉस एंजिल्समध्ये तिच्या तीन रूममेट्ससोबत राहते, कारण हे तिच्यासाठी परवडणारे आहे.
मुलाखतीत व्हिव्हियनने सांगितले की, ती परदेशी भाषांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करत आहे. सध्या ती तिच्या आईसोबत राहते आणि तिची आई श्रीमंत आहे. पण तिने स्पष्ट केले की, तिला तिच्या वडिलांसारखे ‘सर्वात श्रीमंत’ व्हायचे नाही.
वडिलांसोबत वादामुळे संबंध तुटले
व्हिव्हियनने दुःखद भावनेने सांगितले की, ती स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतःच करू शकते. लॉस एंजिल्समध्ये तिच्या वयाच्या अनेक लोकांपेक्षा तिची परिस्थिती चांगली आहे.
व्हिव्हियन आणि एलन मस्क यांच्यामध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते. व्हिव्हियनने मस्कला ‘दयनीय पुरुष-बाळ’ (pathetic man-child) असे संबोधले होते. व्हिव्हियन एक ट्रान्सजेंडर आहे आणि मस्कने तिच्या लैंगिक ओळखीचा (gender identity) स्वीकार केला नाही, असे म्हटले जाते. यामुळे मस्कने तिच्यावर 'वोक माइंड व्हायरस'चा (woke mind virus) बळी झाल्याचा आरोप केला होता. या वादानंतरच व्हिव्हियनने आपल्या वडिलांसोबतचे संबंध तोडले.

