Elon Musk : एलन मस्क इटलीच्या पंतप्रधान मेलोनींच्या प्रेमात? सोशल मीडियावरील फोटोंनी उडवला धुरळा

मस्क आणि मेलोनी यांच्या फोटोने सोशल मिडीयावर खळबळ
Elon Musk
मस्क आणि मेलोनी यांच्या फोटोने सोशल मिडीयावर खळबळPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावरती व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून गेले आहेत. या फोटोमुळे नेटकऱ्यांना या फोटोमधून चांगलाच मसाला मिळाला आहे. या फोटोवरुन माध्यमांमध्ये ते दोघे डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. Elon Musk

Elon Musk
मेलोनी यांचा मोदींसोबत सेल्फी अन् इंटरनेटवर पुन्‍हा #Melodi ट्रेंड

न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी (दि.25) एका पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते एकत्र होते. पंतप्रधान मेलोनी यांना अटलांटिक काउंन्सिल ग्लोबल सिटीझन हा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी मस्क यांनी मेलोनी यांच्यासाठी कौतुकाचे पूल बांधले. मेलोनी या एक प्रामाणिक आणि खरे व्यक्तिमत्व आहे. यावेळी मस्क यांनी मेलोनी यांच्या सौंदर्यावर शब्दांची उधळण केली. यावेळी ते म्हणाले, त्या बाहेरुन जितक्या सुंदर आहेत, त्यापेक्षाही जास्त आतून सुंदर आहेत. Elon Musk

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news