PM मोदी- पुतिन 'गळाभेटी'ची जगभरातील माध्‍यमांनी घेतली दखल

'साऊथ चायना'चे खोचक विश्‍लेषण, 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने केले कौतूक
PM Modi Russia Visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या रशिया दौर्‍याची जगभरातील माध्‍यमांनी दखल घेतली आहेTwitter
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या रशिया दौर्‍याची जगभरातील माध्‍यमांनी दखल घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रशियाची निवड केली. या दौर्‍याबाबत विदेशी प्रसारमाध्यमांचा दृष्टिकोन जाणून घेऊया...

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'चे खोचक विश्‍लेषण

पंतप्रधान मोदी हे प्रेमळपणा आणि आलिंगन देण्याच्या मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन हे हस्तांदोलनासाठी अधिक ओळखले जातात. चिनी प्रसारमाध्यमांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या रशिया दौर्‍यावर लक्ष ठेवले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गळाभेटीच्‍या छायाचित्रावर चीनी माध्‍यमांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तुमची देहबोली अनेकदा शब्दांपेक्षा अधिक प्रकट होते, असे खोचक विश्‍लेषण 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने केले आहे.

PM Modi Russia Visit
PM मोदी 'इफेक्‍ट' : रशियन सैन्‍यात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार

रशियाला एकटे पाडण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी : ग्लोबल टाइम्स

आणखी एका चिनी मीडिया रिपोर्टमध्ये पीएम मोदींच्या दौऱ्याचे वर्णन अमेरिकेसाठी निराशाजनक पाऊल, असे केले आहे. रशिया आणि भारत यांच्यातील घनिष्ट संबंधांचा अर्थ म्हणजे युक्रेन संकट सुरू झाल्यापासून रशियाला एकटे पाडण्याचे अमेरिकेचे सततचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत, असे चीनी विश्लेषक म्हणतात. चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या अहवालात. भारताची संतुलित मुत्सद्देगिरी केवळ त्याच्या हितसंबंधांनुसारच नाही तर जागतिक सामरिक समतोल राखण्यासही हातभार लावते, ज्याला अमेरिकेच्या नेतृत्वाने दीर्घकाळ आव्हान दिले आहे. चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ली हैदोंग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले की, "मोदींच्या रशियाच्या दौऱ्यातून प्रमुख शक्तींमधील परराष्ट्र धोरणाचा समतोल दिसून येतो."

PM Modi Russia Visit
नरेंद्र माेदी यांच्‍या शपथविधी साेहळ्यास ‘या’ दिग्गजांची उपस्‍थिती

मोदींनी रशियाच्या आक्रमकतेचा निषेध करणे टाळले : न्यू यॉर्क टाईम्स

न्यू यॉर्क टाईम्सने म्हटले आहे की, "पाश्चात्य सरकारे भारत आणि जगभरातील इतर अनेक सरकारांना पुतिन यांच्या युद्धाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घेण्यास राजी करण्यात अपयशी ठरल्या आहेत. मोदींनी रशियाच्या आक्रमकतेचा निषेध करणे टाळले आणि त्याऐवजी शांततेचे आवाहन केले."

PM Modi Russia Visit
PM Modi visit Austria | गळाभेट अन् सेल्फी! PM मोदींचे ऑस्ट्रियामध्ये भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी युद्धावर जाहीरपणे बोलले : वॉल स्ट्रीट जर्नल

वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्‍या रिपोर्टमध्‍ये म्‍टहलं आहे की, रशिया दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उघडपणे युद्धाचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी खाजगी वार्तालापाच्या आधी टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या वक्तव्यात पुतिन यांनी या हल्ल्याबद्दल जाहीरपणे टीका केली, 'जेव्हा निष्पाप मुले मारली जातात, जेव्हा आपण निष्पाप मुले मरताना पाहतो तेव्हा ते हृदयद्रावक असते.

PM Modi Russia Visit
PM Modi Congratulates Keir Starmer | पीएम मोदींकडून कीर स्टार्मर यांचे अभिनंदन, दिले भारत भेटीचे निमंत्रण

मोदींचे पुतिन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध : द गार्डियन

ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'नेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यावर भाष्‍य केले आहे. त्‍यांनी आपल्‍या रिपोर्टमध्‍य म्हटले आहे की, भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री शीतयुद्धाच्या काळापासूनची आहे. रशिया हा फार पूर्वीपासून जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. २०१४ मध्ये निवडून आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्याशी चांगले संबंध आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये 20 हून अधिक बैठका झाल्या आहेत.

PM Modi Russia Visit
PM Modi Mann ki Baat|'एक झाड आईच्या नावाचे...'; PM मोदींचे देशवासियांना आवाहन

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना

रशियन न्यूज चॅनेल 'आरटी'ने म्हटले आहे की 2022 मध्ये युक्रेन संघर्ष वाढल्यानंतर पाश्चात्य भागीदारांकडून उघड टीका होऊनही, भारताने धैर्याने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले. या पाऊलामुळे दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार वाढण्यास मोठा हातभार लागला. एका अहवालानुसार, ' 2023-24 या आर्थिक वर्षात द्विपक्षीय व्यापार $65.70 अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये फार्मास्युटिकल्स, सेंद्रिय रसायने, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि यांत्रिक उपकरणे, लोह आणि पोलाद यांचा समावेश होतो, तर रशियातून आयात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये तेल आणि पेट्रोलियम उत्पादने, खते, खनिज संसाधने, मौल्यवान धातू इत्यादींचा समावेश होतो.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news