Trump Putin Alaska meeting | युक्रेनची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही - झेलेन्स्की ठाम; काही प्रदेशांच्या अदलाबदलीची ट्रम्प यांची भूमिका

Trump Putin Alaska meeting | ट्रम्प-पुतिन यांच्यात 15 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष
Volodymyr Zelenskyy
Volodymyr Zelenskyyx
Published on
Updated on

Trump Putin Alaska meeting Ukraine Russia War

कीव्ह ः रशियाशी सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचा भाग कोणत्याही परिस्थितीत गमावू देणार नाही, असा स्पष्ट संदेश युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांनी दिला आहे. शनिवारी रात्री त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली.

झलेंस्की म्हणाले, "रशियासोबतची ही लढाई केवळ जमिनीसाठी नाही, तर न्यायासाठी आहे. आम्हाला दुसरा फाळणीचा धोका मान्य नाही. जिथे दुसरी फाळणी होईल, तिथे तिसरीही होईल. म्हणूनच आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत."

ट्रम्प-पुतिनची 15 ऑगस्टला बैठक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 15 ऑगस्टला अलास्कामध्ये भेट होणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी उपाययोजना आणि संभाव्य करारांवर चर्चा होणार आहे.

पूर्वी ट्रम्प यांनी सांगितले होते की, "युद्ध संपवण्यासाठी काही प्रदेशांची अदलाबदल होणे आवश्यक आहे." यावर तीव्र प्रतिक्रिया देत झेलेन्स्की यांनी पुन्हा स्पष्ट केले की, "जमिन देऊन शांती मिळवण्याची भूमिका आम्ही स्वीकारणार नाही."

Volodymyr Zelenskyy
Robot Mall | अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारखा रोबोट; 'या' देशात सुरू झाला जगातला पहिला रोबो मॉल; किंमत **,500 रुपयांपासून पुढे

ट्रम्प, पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कैरोलिन लेविट यांनी मंगळवारी सांगितले की, ट्रम्प पुतिन आणि जेलेंस्की यांच्यात त्रैपक्षीय चर्चा घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, रशियाने ट्रम्पसोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितले. याआधी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची शेवटची भेट 26 एप्रिल रोजी वेटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी झाली होती.

पुतिन यांची ट्रम्प यांच्या विशेष दूतांनी घेतली भेट

ट्रम्पचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी नुकतीच मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली. क्रेमलिनचे सल्लागार युरी उशाकोव यांनी सांगितले की, युक्रेन मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली.

हवाई हल्ले थांबवण्यासाठी तात्पुरता प्रस्ताव

रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनवरचे हवाई हल्ले तात्पुरते थांबवण्याचा प्रस्ताव मांडू शकते. हे प्रस्ताव बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेंको यांच्या पुतिनसोबतच्या भेटीत सुचवले गेले.

मात्र हा प्रस्ताव युद्धविराम नसून केवळ एक ‘श्वास’ असेल. मे महिन्यानंतर रशियाने युक्रेनवर सर्वात तीव्र हवाई हल्ले केले, ज्यात कीवमध्ये 72 नागरिकांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी हे हल्ले ‘भीषण आणि अमानवी’ म्हणत निषेध केला होता.

Volodymyr Zelenskyy
Pakistan airspace closure | भारताशी पंगा पाकिस्तानला महागात! विमानांना एअरस्पेस बंद केल्याने 'इतके' अब्ज रुपयांचे नुकसान

रशिया-युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी

  • फेब्रुवारी 2022: रशियाचे युक्रेनवर आक्रमण, संपूर्ण युरोपमध्ये भीतीचे वातावरण. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा तीव्र विरोध.

  • फेब्रुवारी 2025: ट्रम्पने राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुतिनशी 90 मिनिटे फोनवर चर्चा. युक्रेनशिवाय सऊदीमध्ये रशिया-अमेरिका बैठक. ट्रम्पने जेलेंस्कीला ‘तानाशाह’ म्हटले.

  • मे 2025: युद्ध समाप्तीसाठी शांतता प्रक्रिया वेगाने सुरू. काही कैद्यांची अदलाबदल झाली. मात्र, प्रदेशीय हक्क व सुरक्षेच्या मुद्द्यावर मतभेद कायम.

या वर्षात ट्रम्प-पुतिन संवाद :

  • 12 फेब्रुवारी: युक्रेन युद्ध समाप्त करण्यावर चर्चा

  • 18 मार्च: युद्धविराम व शांतता उपाय

  • 19 मे: दोन तासांपेक्षा अधिक चर्चेत युद्ध व इतर विषय

  • 4 जून: युक्रेन आणि इराणविषयी एक तास चर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news