

अॅथेन्स, वृत्तसंस्था : जुलै 2023 हा महिना जगभरातच सर्वांत उष्ण ठरला आहे. ग्रीसमध्ये गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक उष्ण म्हणून जुलै महिन्याची नोंद झाली आहे. दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडापाठोपाठ वाढत्या तापमानामुळे आता ग्रीसच्या एका जंगलात वणवा पेटला आहे. लष्कर आणि तटरक्षक दल तैनात करण्यात आले असून, अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
3 आणि 4 जुलै ठरले सर्वात उष्ण दिवस
3 जुलै हा दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून गणला गेला. यादिवशी जागतिक तापमानात सरासरी 17.1 अंश सेल्सिअस, तर दुसर्या दिवशी म्हणजे बुधवारी 17.18 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
धगधगते ग्रीस : आकडे बोलतात
40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान ग्रीसमध्ये आहे.
79 ठिकाणी र्होडस् बेटातील जंगलातून वणवा पेटला आहे.
173 अग्निशमन पथके, 5 हेलिकॉप्टर सतत व्यग्र आहेत.
30 हजारांवर लगतच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
35 चौ. कि. मी. जंगल आतापर्यंत खाक झाले आहे.
38 जणांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
03 अंशांची वाढ समुद्राच्या तापमानात नोंदवण्यात आली आहे.
तापमानवाढीचे कारण काय?
* पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे.
* यामागे जीवाश्म इंधनाचे ज्वलन हे मानवनिर्मित कारण असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे.
2050 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 ते 2 अंशांनी वाढल्यास…
* 10 वर्षांत आर्क्टिक महासागराचा संपूर्ण बर्फ वितळेल
* मालदीवसारखे देश समुद्रात बुडायला सुरुवात होईल.
* मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम आदी 12 शहरे 3 फूट पाण्यात बुडतील.