’ऑल आइज ऑन रफाह’ का ट्रेंड होत आहे? जाणून घ्या कारण

’ऑल आइज ऑन रफाह’ का ट्रेंड होत आहे? जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'ऑल आयज ऑन रफाह'च्या पोस्टने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोक पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी इस्रायलच्या हल्ल्याचा ऑनलाइन निषेध करत आहेत. जगभरातील लोक या निषेधात इतक्या वेगाने सामील झाले की 1 दिवसात 4 कोटीपेक्षा जास्त लोकांनी #AllEyesOnRafah वर ही पोस्ट पोस्ट केली. ऑल आइज ऑन रफा कुठून आले, गेल्या रविवारी, इस्रायलने गाझा भागात निर्वासित राहत असलेल्या भागात जोरदार बॉम्बफेक केली. रिपोर्ट्सनुसार, दक्षिण गाझामधील रफाह शहरात झालेल्या गोळीबार आणि हवाई हल्ल्यात 45 लोक ठार झाले आहेत.

ऑल आइज ऑन रफाह घोषणा कुठून आली?

फेब्रुवारी 2024 मध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या शेवटच्या गडांवर नियोजित हल्ल्यांपूर्वी शहर रिकामे करण्याचे आदेश दिले. हे घोषवाक्य पहिल्यांदाच त्यांनी फेब्रुवारीमध्ये उच्चारले. तेव्हापासून हे वाक्य प्रचलित झाले.

रफाहकडे सर्वांचे लक्ष का आहे?

'ऑल आइज ऑन रफा' हा एक वाक्यांश आहे. जो भारतातील इराणच्या दूतावासाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला होता. या वाक्प्रचाराच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, या भीषण हत्याकांडाच्या काळात पॅलेस्टाईनमधील 14 लाख लोक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत. सोशल मीडियावर दक्षिण गाझाचे क्षेत्र दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये निर्वासितांसाठी अनेक तंबू बांधण्यात आले आहेत. या प्रतिमेद्वारे, लोकांना रफाह शहरात जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले जात आहे. भीषण युद्धामुळे 14 लाखांहून अधिक लोकांनी पलायन करून तेथे आश्रय घेतला आहे.

ऑल आइज ऑन रफाहच्या समर्थनार्थ सेलिब्रिटीही पुढे आले

सोशल मीडियावर पोस्ट शेअर होत आहेत. यामध्ये जागतिक स्तरावर, अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि पोस्ट शेअर केली आहे. भारतातही हा ट्रेंड सुरू झाला. यांमध्ये संमथा रूथ प्रभू, वरुण धवन, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, रश्मिका मंदान्ना, सोनाक्षी सिन्हा, तृप्ती डिमरी, दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढा यासारख्या प्रख्यात भारतीय कलाकारांनी ऑल आइज ऑन रफा पोस्ट केले.

क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी

भारताचा क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह देखील सेलिब्रेटींपैकी एक होती जिने 'ऑल आइज ऑन राफा' ही पोस्ट शेअर केली होती. मात्र, जोरदार ट्रोलिंग झाल्यानंतर तिनी ती पोस्ट डिलीट केली. यादरम्यान, अनेक युजर्सनी रितीकावर जोरदार टीका केली. 'रोहित शर्माची पत्नी काश्मिरी पंडितांबद्दल कधीच बोलत नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंबद्दल कधीच बोलत नाही. पण ती पॅलेस्टाईन आणि गाझाबद्दल खूप काळजी दाखवत आहे,' असा टोला लगावला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news