Balochistan Conflict | पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील बंडखोरांमध्ये महिला आत्मघाती हल्लेखोरांची संख्या का वाढत आहे?

पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान दीर्घकाळापासून संघर्षाच्या विळख्यात
Balochistan Conflict
हवा बलोच, पाकिस्तानी सैन्याबरोबरील चकमकीत ठार झालेल्‍या आत्मघातकी हल्लेखोर असिफा मेंगलसोबत. @LabDiscourse on X
Published on
Updated on

Balochistan conflict news

नवी दिल्ली : पाकिस्‍तानमधील बंडखोर गट 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'ने (BLA) एका महिला 'फिदायीन' (आत्मघाती हल्लेखोर) चा व्हिडिओ जारी केला आहे. ही महिला गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतात झालेल्या मोठ्या हल्ल्यात सामील होती. हा हल्‍ला अलिकडच्या वर्षांतील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या क्लिपमध्ये, 'हवा बलोच' असे नाव असलेली ही हल्लेखोर ग्वादर फ्रंटवर BLA च्या 'ऑपरेशन हेरॉफ'च्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांवर गोळीबार करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी झालेल्या भीषण गोळीबार आणि आत्मघाती बॉम्बस्फोटांच्या मालिकेत किमान ३३ जणांचा मृत्यू झाला. 'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, बलुच बंडखोरांनी सामान्य नागरिक, अतिसुरक्षित कारागृहे, पोलीस ठाणी आणि निमलष्करी दलांच्या तळांना लक्ष्य केले. मृतांमध्ये १८ नागरिक आणि १५ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्‍यान, मागील काही वर्षांमध्‍ये बलुच बंडखोरांमध्‍ये महिला आत्‍मघाती हल्‍लेखोरांचे संख्‍या वाढत आहे. जाणून घेवूया यामागील कारण.

बलुच बंडखोर महिला आता थेट युद्धभूमीवर

क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान दीर्घकाळापासून संघर्षाच्या विळख्यात आहे. राजकीय उपेक्षा, आर्थिक दुर्लक्ष आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असल्याचा आरोप करत विविध बलुच सशस्त्र गट सरकारविरोधात लढत आहेत. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत या संघर्षात एक धक्कादायक बदल दिसून आला आहे. महिला आता थेट युद्धभूमीवर उतरत असून आत्मघाती हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. "ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यात ग्वादर फ्रंटवर, फिदायीन हवा बलोच आपल्या सहकारी फिदायीनसोबत खांद्याला खांदा लावून निःस्वार्थपणे लढली. तिच्या मृत्यूच्या बारा तास आधी पाठवलेला हा तिचा शेवटचा संदेश होता," असे बंडखोर गटाने व्हिडिओसोबत दिलेल्या संदेशात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये हवा बलोच कॅमेऱ्यासमोर म्हणतेय, "बलोच राष्ट्रहो, आज तुमची एक बहीण पाकिस्‍तानी सैन्याचा सामना करत आहे. आता तुम्ही लोकांनी हिंमतीने पुढे आले पाहिजे. आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही."

Balochistan Conflict
Balochistan Attack: बलूचिस्तानमध्ये बंडखोर BLA चा एकाचवेळी तब्बल १२ शहरांवर हल्ला; पाकिस्तानी सैन्य पोस्ट सोडून गेलं पळून

'ऑपरेशन हेरॉफ'मध्‍ये महिलांचा सहभाग

बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) खारान, मस्तुंग, क्वेटा आणि नोशकीसह अनेक भागात ४० तास 'ऑपरेशन हेरॉफ फेज-२' राबवले. या कारवाईत १८ 'फिदायीन' (आत्मघाती हल्लेखोर) मारले गेले, ज्यातील ११ महिला होत्या. यात नोशकी येथील ISI मुख्यालयावर हल्ला करणारी असिफा मेंगल आणि ग्वादर आघाडीवर सक्रिय असलेल्या हवा बलुच यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही किमान दोन हल्ल्यांमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे मान्य केले आहे.

Balochistan Conflict
China deploy military in Balochistan: चीन बलुचिस्तानमध्ये लष्कर तैनात करणार...? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना खुलं पत्र

कोण आहे हवा बलोच ?

रिपोर्टनुसार, हवा बलोच ही 'जेन झी' (Gen Z) पिढीतील तरुणी आहे, जिचे वडील BLA चे लढवय्ये होते आणि २०२१ मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी त्यांना ठार केले होते. बंडखोरीत सामील होण्यापूर्वी तिने औपचारिक शिक्षण घेतल्याचेही समजते. यामुळे आता बलोच फुटीरतावादी चळवळीत तरुणाई सक्रीय झाल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. दरम्‍यान, पाकिस्तानी सैन्याने सांगितले आहे की, बलुचिस्‍तान आर्मीविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तरी कारवाईत शनिवारी ९२ फुटीरतावादी मारले गेले, तर शुक्रवारी ४१ जण मारले गेले. BLA ने देखील आपल्या बाजूने झालेल्या नुकसानीची कबुली दिली असून, या मोहिमेदरम्यान त्यांचे १८ लढवय्ये मारले गेल्याचे सांगितले आहे. यामध्ये मजीद ब्रिगेडचे ११ 'फिदायीन' (आत्मघाती हल्लेखोर), फतेह स्क्वॉशचे ४ लढवय्ये आणि STOS युनिटचे ३ लढवय्ये यांचा समावेश आहे.

पुरुषांच्या वर्चस्वाकडून महिलांच्या 'फिदायीन' हल्ल्यांकडे

सुरुवातीला बलुच बंडखोरीत पुरुषांचे वर्चस्व होते. येथे आत्मघाती हल्ले दुर्मिळ मानले जात होते. मात्र, २०२२ पासून यात वेगाने बदल झाला आहे. पूर्वी महिला केवळ संदेशवहण, निधी संकलन किंवा आंदोलनांपुरत्या मर्यादित होत्या. आता त्या आत्मघाती मोहिमांचे नेतृत्व करत आहेत.

Balochistan Conflict
Balochistan Operation Baam | बलुच बंडखोरांचा पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणांवर हल्ला; 17 ठिकाणी घाव

बलुच बंडखोर आर्मीतील महिला आत्मघाती हल्लेखोर...

  • शारी बलुच ही कराची विद्यापीठात चिनी शिक्षकांवर हल्ला करणारी (एप्रिल २०२२) पहिली महिला आत्मघाती हल्लेखोर ठरली. विशेष म्‍हणजे शारी ही दोन मुलांची आई आणि उच्चशिक्षित (MSc, MPhil) शिक्षिका होती.

  • सुमैय्या कलंदराणी बलुच (जून २०२३): तुर्बतमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्‍यात तिचा सहभाग होता.

  • महल बलुच (ऑगस्ट २०२४): बेला येथील FC कॅम्पच्या प्रवेशद्वारावर कार बॉम्बने हल्ला.

  • माहिकन बलुच (मार्च २०२५): कलातमध्ये निमलष्करी दलाच्या ताफ्याला लक्ष्य केले.

  • नोव्हेंबर २०२५ मध्ये झरीना रफिक उर्फ 'तरंग माहो' हिने चाघी जिल्ह्यात आत्मघाती हल्ला केला. विशेष म्हणजे, ती BLF (बलुच लिबरेशन फ्रंट) ची पहिली महिला आत्मघाती हल्लेखोर होती, ज्यावरून असे स्पष्ट होते की आता सर्वच प्रमुख बंडखोर गट या रणनीतीचा वापर करत आहेत.

Balochistan Conflict
Pakistan Division Demands: ४ नाही पाकिस्तानचे १६ तुकडे करा...? भारत नाही त्यांच्याच मंत्र्याची मोठी मागणी

महिलांचा वापर का केला जातोय?

बलुचिस्तानच्या पितृसत्ताक समाजात महिलेने आत्मघाती हल्ला करणे हा एक मोठा संदेश मानला जातो. "सरकारी दडपशाही इतकी वाढली आहे की, महिलांनाही टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे," असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे गट करत आहेत. महिलांच्या सहभागाचा वापर करून पुरुषांना या लढ्यात सामील होण्यासाठी चिथावणी दिली जाते. एकेकाळी आत्मघाती हल्ल्यांचा विरोध करणारे गट आता महिलांना या आत्मघातकी मोहिमांमध्ये सामील करून घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news