UK general election| कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान, ऋषी सुनाक यांना पराभवाचा धक्का

लेबर पक्षाची १४ वर्षानंतर सत्तेत वापसी
UK general election
कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनाक यांना पराभवाचा धक्का बसला आहे. X

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीमध्ये (UK general election) ‍‍‍विरोधी लेबर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. ६५० जागा असलेल्या ब्रिटनच्या संसदेत लेबर पक्षाने ३७० हून अधिक जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. यामुळे लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर (Keir Starmer) हे नवे पंतप्रधान (UK Prime Minister) होणार आहेत. तर सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनाक (Rishi Sunak) यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे विरोधी लेबर पक्ष १४ वर्षानंतर सत्तेत वापसी केली आहे.

ऋषी सुनाक यांनी मान्य केला पराभव

बीबीसीच्या वृत्तानुसार, लेबर पक्षाने आतापर्यंत ३७० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने ९० जागा मिळवल्या आहेत. ऋषी सुनाक यांनी पराभव मान्य करत कीर स्टार्मर यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तर 'आता परिवर्तनाला सुरवात झाली आहे. आम्ही ते केले,' असे प्रतिक्रिया लेबरने सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यामुळे स्टार्मर यांनी दिली आहे.

"लेबर पक्षाने ही सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे आणि मी कीर स्टार्मर यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे," असे सुनाक यांनी सांगितले.

लेबर पक्षाला ४१० जागा मिळतील

एक्झिट पोलमधून लेबर पक्षाचा मोठा विजय होईल आणि ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. लेबर पक्षाला ४१० जागा मिळतील, तर कंझर्व्हेटिव्हला १४४ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

UK general election
ब्रिटनच्या निवडणुकीत सुनाक यांची कसाेटी

अखेरच्या टप्प्यात सुनाक यांनी प्रत्येक मतासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते. ब्रिटनमध्ये गेल्या १४ वर्षांपासून कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सत्ता आहे. या सरकारच्या राजवटीत ब्रिटनमध्ये सर्वाधिक कर आकारला जात असल्याचे बोलले जात आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये ब्रिटनमधील लोकांवर सर्वाधिक कर आकारला जात असल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा मोठा पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. तर कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील विरोधी लेबर पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला आहे.

UK general election
भारत-ब्रिटन ऐतिहासिक पाऊल टाकतील?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news