

China BVR missile
बीजिंग : चीनने नुकतेच 1000 किमी पल्ल्याचे ‘बीव्हीआर’ (BVR – Beyond Visual Range) क्षेपणास्त्र यशस्वीपणे चाचणीद्वारे सिद्ध केले आहे, अशी माहिती South China Morning Post ने दिली आहे.
हे क्षेपणास्त्र इतके प्रगत आहे की जगातील सर्वोच्च तंत्रज्ञानयुक्त लढाऊ विमानांसारख्या F-35, F-22 Raptor, राफेल, सुखोई आणि अगदी भविष्यातील B-21 Raider सारख्या विमानांना देखील 1000 किमी अंतरावरून लक्ष्य करू शकते.
बीवायआर (BVR) ही एक प्रगत तंत्रज्ञान प्रणाली असून यामध्ये शत्रूच्या विमानांना दृश्य मर्यादेपलीकडे (Beyond Visual Range) लक्ष्य करण्याची क्षमता असते.
सामान्यतः एक पायलट 30-40 किमी अंतरावरील लक्ष्य पाहू शकतो, पण BVR प्रणाली 300 किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य स्वतः शोधते आणि नष्ट करते. चीनचे हे नवीन क्षेपणास्त्र तर थेट 1000 किमी पर्यंत पोहोचते!
गती: माच 5 (Mach 5) म्हणजेच ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपट वेग.
क्षमता: अगदी 5व्या आणि 5+ पिढीच्या लढाऊ विमानांनाही निष्प्रभ ठरवू शकते.
अचूकता: लक्ष्य शोधून नष्ट करणारी ‘फायर अँड फॉरगेट’ प्रणाली.
रशिया: R-37M (पल्ला 350-400 किमी)
अमेरिका: AIM-174B (पल्ला 400 किमीपर्यंत)
भारत : अॅस्ट्रा MK-1 (80-110 किमी), अॅस्ट्रा MK-2 (200 किमी चाचणीत), MK-3 (350-400 किमी गतीने विकासाधीन)
चीनने जर प्रत्यक्षात 1000 किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र तयार केले असेल, तर हा जागतिक सामरिक समतोलच बदलू शकतो, असे संरक्षण तज्ज्ञ सांगतात.
चीनच्या या प्रगत क्षेपणास्त्रामुळे भारत, अमेरिका, तैवान आणि जपान यांचे हवाई संरक्षण धोका निर्माण होतो. विशेषतः भारतासाठी. कारण सध्या केवळ अॅस्ट्रा MK-1 ही BVR क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 MKI मध्ये वापरली जात आहेत.
MK-2 पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, MK-3 साठी DRDO आणि ISRO एकत्र काम करत आहेत.
अॅस्ट्रा प्रकल्प 2000 मध्ये सुरू झाला, परंतु प्रगती तुलनेत संथ होती.
चीन हे क्षेपणास्त्र तैवान सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्र यांसारख्या संभाव्य संघर्ष क्षेत्रात तैनात करण्याच्या तयारीत आहे. याद्वारे चीन अमेरिकेच्या आणि भारताच्या हवाई ताकदीला दूरवरूनच निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करणार आहे.
चीनची ही नवीन क्षेपणास्त्र प्रणाली केवळ सैन्य दृष्टिकोनातून प्रगत नाही, तर ती संपूर्ण आशिया-पॅसिफिक सामरिक समीकरणे बदलू शकते. भारताला आता BVR क्षेपणास्त्र विकासात गती द्यावी लागेल, अन्यथा संरक्षणात महत्त्वाचा फट राहण्याची शक्यता आहे.