

vijay deverakonda rashmika mandanna udaipur wedding mangalsutra moment
पुढारी ऑनलाईन
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना तब्बल ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे दोघांनी भव्य, पारंपरिक पण खासगी पद्धतीने विवाह केला.
विशेष म्हणजे, हे पहिल्यांदाच नाही की दोघं “लग्नाच्या” बंधनात अडकले होते. २०१८ साली आलेल्या सुपरहिट तेलुगू चित्रपट Geetha Govindam मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. या रोमँटिक ड्रामाच्या शेवटी त्यांच्या पात्रांचा लग्नाचा सीन चित्रीत करण्यात आला होता, जो विजय देवरकोंडासाठी एक विचित्र अनुभव ठरला.
विजय म्हणाला होता, “तो अनुभव खरोखरच विचित्र होता.” शूटिंगबद्दल बोलताना विजय देवरकोंडाने NTV ला सांगितले,
“फक्त पेली मंडपात बसणं ठीक होतं, पण जेव्हा मला तीन गाठी बांधायला सांगितल्या, तेव्हा मला खूप भीती वाटली. मला माहीत होतं की हे फक्त शूट आहे, पण रश्मिका पाट्टू साडीत बसली होती आणि मी पाट्टू पंचा घातलेला होता. सगळं अगदी खर्या लग्नासारखं दिसत होतं – फुलांनी सजलेलं. त्यांनी मला सांगितलं, ‘तीनही गाठी बांध.’ तेव्हा माझ्या मनात आलं, हे नक्की काय चाललंय? मी हिरोईनलाच म्हणत होतो की हे खूपच विचित्र आहे. हा तिच्या तिसऱ्या ऑन-स्क्रीन लग्नाचा सीन होता आणि तिला अजिबात फरक पडत नव्हता. मात्र माझी चांगलीच पंचायत झाली होती.”
रील लाइफपासून रिअल लाइफपर्यंत
चित्रपटानंतर विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत सातत्याने अफवा पसरत होत्या, मात्र दोघांनी कायमच मौन पाळलं. अखेर लग्नाच्या काही दिवस आधीच त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली.
लग्नानंतर विजयने पत्नीबद्दल इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणतो,
“एक दिवस मला तिची तीव्र आठवण आली. अशी आठवण की ती माझ्यासोबत असती तर माझा दिवस अधिक चांगला गेला असता. ती समोर बसली असती तर जेवण अधिक चविष्ट लागलं असतं. ती सोबत असती तर वर्कआउट्स अधिक मजेशीर झाले असते. मला फक्त तिचीच गरज वाटत होती — घरासारखं, शांत वाटण्यासाठी, मी कुठेही असलो तरी. म्हणूनच मी माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीलाच माझी पत्नी बनवलं.”
रश्मिकानेही एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं,
“आता तुमची ओळख करून देते – ‘माझे पती’! श्री विजय देवरकोंडा! तो माणूस ज्याने मला खऱ्या प्रेमाची जाणीव करून दिली. ज्याने मला शांतता काय असते हे शिकवलं. ज्याने मला दररोज आठवण करून दिली की मोठी स्वप्नं पाहणं अगदी योग्य आहे आणि मला सतत विश्वास दिला की मी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त काही साध्य करू शकते.”