Donald Trump Nobel: अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आला नोबेल पुरस्कार.... व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

Donald Trump Nobel
Donald Trump Nobelpudhari photo
Published on
Updated on

Donald Trump Nobel: डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा काही लपून राहिली नव्हती. मात्र यंदाचा नोबेल पुरस्कार हा व्हेनेजुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मिळाला होता. त्यांनी देखील आपला पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प अन् अमेरिकेला समर्पित केला होता.

Donald Trump Nobel
Donald Trump | इराणबाबत सावध पावले टाका

मचाडो यांनी पदक केलं भेट?

दरम्यान, नुकतेच व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मचाडो यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपले नोबेल शांती पुरस्कार पदक भेट दिलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा स्विकार केला आहे की नाही हे समजू शकलेलं नाही. मचाडो या गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्या होत्या.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि मचाडो यांच्या भेटीमुळे व्हेनेजुएलामधील राजकीय भविष्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली होती.

Donald Trump Nobel
Donald Trump | ट्रम्प यांची एकाधिकारशाही

त्यानंतर गुरूवारी ट्रम्प आणि मचाडो यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. त्या ज्यावेळी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. समर्थकांनी सांगितलं की, 'आमचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे.' त्यानंतर ट्रम्प यांच्या नावाचा जयघोष केला. मचाडो व्हाईट हाऊसनंतर वॉशिंग्टनमध्ये इतर कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.

Donald Trump Nobel
Maduro India connection | मादुरो यांचे भारत कनेक्शन : सत्य साईबाबांचे होते अनुयायी

पदकांचा स्विकार झाला?

त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पारितोषिक स्विकारलं का असा प्रश्न मचाडो यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. अनेक आठवड्यापासून ट्रम्पला त्या नोबेल पारितोषिक देण्याची शक्यात वर्तवली जात होती. याबाबत त्यांनी मागेही काही वक्तवे केली होती.

नोबेल शांती पुरस्कार देणाऱ्या संस्थेने यापूर्वीच स्पष्टे केलं आहे की नियमानुसार हा नोबेल पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news