Iran US conflict : ट्रम्प यांचे युद्धविषयक अधिकार कायम

इराणविरुद्धची लष्करी कारवाई रोखण्याचा ठराव अमेरिकन सिनेटने फेटाळला
Iran US conflict
Iran US conflict : ट्रम्प यांचे युद्धविषयक अधिकार कायमfile photo
Published on
Updated on

वाशिंग्टन : वृत्तसंस्था

इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार मर्यादित करणारा द्विपक्षीय ठराव अमेरिकन सिनेटने बुधवारी फेटाळून लावला. डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर टिम केन आणि रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात झालेल्या चर्चेनंतर 47 विरुद्ध 53 मतांनी फेटाळण्यात आला.

असा होता ठराव

जोपर्यंत अमेरिकन काँग्रेस (संसद) अधिकृत परवानगी देत नाही, तोपर्यंत राष्ट्राध्यक्षांनी इराणमधील लष्करी कारवाया थांबवाव्यात आणि सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली होती. मात्र, सिनेटमध्ये रिपब्लिकन सदस्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला भक्कम पाठिंबा दिला.

47 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर 53 सदस्यांनी विरोधात मतदान केले. रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात जात ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर जॉन फेटरमन यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देत ठरावाच्या विरोधात मतदान केले.

Iran US conflict
US Iran Isreal Conflict: अमेरिकेची भारतावर कृपादृष्टी... ३० दिवसांची दिली सूट, इंधनाचा प्रश्न तुर्तास तरी मिटला

काँग्रेसला डावलल्याचा आरोप

ठरावावर झालेल्या चर्चेवेळी डेमोक्रॅटिक सदस्यांनी असा युक्तिवाद केला की, ट्रम्प प्रशासनाने संसदेला डावलून असंवैधानिक पद्धतीने युद्ध पुकारले आहे. मंगळवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत इराणकडून अमेरिकेला तत्काळ धोका असल्याचा कोणताही पुरावा प्रशासनाने दिला नसल्याचे सिनेटर टिम केन यांनी नमूद केले.

इराण विरोधात सुरू असलेल्या या युद्धाच्या नावाखाली सुरू असलेली ही कारवाई अजून काही आठवडे चालू शकते, अशी माहिती प्रशासनाने खासदारांना दिली आहे.

प्रशासनाचा बचाव

रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्रम्प यांची पाठराखण करताना सांगितले की, 1973 चा वॉर पॉवर्स ॲक्ट असंवैधानिक आहे आणि राष्ट्राध्यक्षांना संरक्षणासाठी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत.

Iran US conflict
Israel US Iran War | अमेरिकन तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

प्रतिनिधीगृहात ठरावाची शक्यता

हे मतदान अशा वेळी झाले आहे जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून कुवेतमध्ये काही अमेरिकन सैनिकांचाही बळी गेला आहे. सिनेटमध्ये हा ठराव फेटाळला गेला असला तरी प्रतिनिधीगृहात अशाच प्रकारच्या ठरावावर मतदान होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news