US Iran Isreal Conflict: अमेरिकेची भारतावर कृपादृष्टी... ३० दिवसांची दिली सूट, इंधनाचा प्रश्न तुर्तास तरी मिटला

US Iran Isreal Conflict
US Iran Isreal Conflictpudhari photo
Published on
Updated on

US Iran Isreal Conflict India Oil Crisis: इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे जगभरात तेल संकट निर्माण झालं आहे हार्मुझ सामुद्रधुनीवर इराण नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत असून तेथून होणारी इंधन वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळं भारतासारख्या तेलासाठी जवळपास ९० टक्के आयातीवर अवलंबून असलेल्या देशाची कोंडी झाली होती. त्यात अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर कडक निर्बंध लादत टॅरिफचा बडगा उगारला होता. अखेर भारताची ही तेल कोंडी ३० दिवसांसाठी तरी फुटली आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेने हा निर्णय जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी घेतला आहे. सध्या मध्य पूर्व आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

US Iran Isreal Conflict
Israel US Iran War | अमेरिकन तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

ट्रेजरी विभागानं दिली परवानगी

शुक्रवारी युएस ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी याबाबतचा निर्णय एक्सवरून जाहीर केला. त्यांनी ट्रेजरी विभागानं रशियाकडून क्रूड ऑल खरेदी करण्यासाठी काही काळासाठी परवानगी दिली आहे.

स्कॉट म्हणाले, 'जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा नियमीत करण्यासाठी ट्रेजरी विभागानं भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियाकडून ३० दिवस तेल खरेदी करण्याची मुभा दिली आहे.' त्यांनी भारत भविष्यात उर्जेच्या बाबतीतील अमेरिकेतून होणारी आयात वाढवेल अशी अपेक्षा आहे.

US Iran Isreal Conflict
Iran Israel US conflict impact: दुबईत अडकलेले 20 पर्यटक मायदेशी दाखल

मध्यपूर्व आशियात तणाव

इराण-इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळं मध्य पूर्व आशियातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. मोठ्या प्रमाणावरील जगातील तेल वाहतूक ही होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. याच मार्गातून जगातील अनेक तेल टँकर हे प्रवास करत असतात. ही सामुद्रधुनी सध्या संघर्षाचा पॉईंट झाला आहे.

तत्पूर्वी रशियाने यापूर्वीच भारताला कच्च तेल पुरवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. जवळपास ९.५ मिलियन बॅरल रशियन तेल हे भारताच्या समुद्र हद्दीच्या जवळ उभं आहे. हे तेल काही आठवड्यातच भारतात पोहचू शकतं अशी माहिती रायटर्सने दिली आहे.

भारताचे जवळपास ४० टक्के कच्च तेल हे होर्मुझ मार्गाने भारतात पोहचतं. तिथं इराण तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहे. त्यामुळं जगातिक तेल बाजारात मोठी भीती पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news