School Abuse Case: कॅफिन देऊन 11 वर्षांच्या मुलावर महिलेने केले लैंगिक अत्याचार; अमेरिकेत घडली थरकाप उडवणारी घटना

Alyson Cranick: कनेक्टिकट राज्यातील अ‍ॅलिसन क्रॅनिक हिने Snapchat आणि Discord द्वारे 11 वर्षीय मुलाला फुस लावून अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तीने मुलाला जागं ठेवण्यासाठी कॅफिनयुक्त पेये दिली आणि भेटवस्तूचे आमिष दाखवल्याचे कबूल केले आहे.
School Abuse Case
School Abuse CasePudhari
Published on
Updated on

Alyson Cranick case: अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यात एका 11 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 44 वर्षांच्या अ‍ॅलिसन क्रॅनिक नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. ती या प्रकरणात दोषीही ठरली आहे. तपासात उघड झाले की, आरोपी महिलेनं मुलाशी Snapchat आणि Discord वरून संपर्क साधला आणि त्याला उशिरा रात्री घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडले. तिने मुलाला जागं ठेवण्यासाठी त्याला कॅफिनयुक्त पेय दिल्याचेही कबूल केले आहे.

क्रॅनिकने मुलाला आकर्षित करण्यासाठी Apple AirPods आणि प्लास्टिक पेललेट्स फायर करणारी बंदूक देण्याचे आमिष दाखवले होते. पोलिसांनी सांगितले की, तिने मुलाला अनेक वेळा कारमध्ये फिरायला नेऊन किमान 14 वेळा त्याच्यावर अत्याचार केला.

School Abuse Case
Evolution of Kissing: किस करण्याची सुरुवात कधी झाली? शास्त्रज्ञांनी सांगितला उत्क्रांतीचा इतिहास

2023 मध्ये मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणात क्रॅनिकवर औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला अटक झाली. जामिनावर बाहेर आल्यावरही तिने 13 वर्षांच्या एका मुलीशी सोशल मीडियावर संपर्क साधून जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले आणि तिला पुन्हा अटक करण्यात आली.

ही महिला कोलंबिया स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये काम करत होती आणि EO Smith हायस्कूलमध्ये प्रशासकीय सहाय्यक म्हणूनही काम करत होती. प्रकरण समोर आल्यानंतर तिला तत्काळ कामावरुन काढण्यात आले. शाळातील प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.

School Abuse Case
kissing evolution: चुंबनाची वैज्ञानिक व्याख्या काय? तुम्ही ज्याला प्रेम म्हणता, तो तर 'धोकादायक जुगार'! शास्त्रज्ञांचा खुलासा

क्रॅनिकला अल्पवयीन मुलाला फूस लावणे आणि लैंगिक शोषणास भाग पाडणे यांसारख्या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागणार असून, तिला किमान 10 वर्षांपासून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news